‘तुकडेबंदी’चे उल्लंघन
तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अम्युझमेन्ट पार्कसाठी घेतलेल्या जमिनीचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. काटोल आणि सावनेर तालुक्यात हे प्रकार होत असून प्रशासनाने अद्याप यावर पायबंद घातला नाही. विशेष म्हणजे, खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी होतेच कशी असाही प्रश्न यातून पुढे आला आहे.
नागपूर जिल्ह्य़ात १४ तालुके आहेत. त्यापैकी सावनेर, काटोल या भागात अम्युझमेन्ट पार्कची संख्या अधिक आहे. काही सुरू आहेत, तर काही बंद आहेत. यासाठी शासनाकडून परवानगी घेताना ते केवळ मनोरंजनासाठी असेल असे सांगण्यात येते. जिल्हा प्रशासनाकडून मनोरंजन कर आकारणीही केली जाते. नियमानुसार या उपक्रमासाठी घेतलेल्या जमिनीवर फक्त १० टक्केच पक्के बांधकाम करण्याची परवानगी आहे. पर्यटकांना राहण्यासाठी तात्पूर्ती निवास व्यवस्था (झोपडय़ा किंवा तत्सम) हे त्यामागचे कारण आहे. याचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तुकडेबंदी कायद्यानुसार एक गुंठे, दोन गुंठे जागा विकता येत नाही, मात्र काटोल व सावनेर तालुक्यात हा नियम धाब्यावर बसवला जात आहे. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी भाडेपट्टीवर जागा देण्यात आल्या आहेत. नियमानुसार हे सुद्धा चुकीचे आहे. काटोल तालुक्यात अलीकडेच शंभर किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांसाठी एक जागा भाडेपट्टीवर देण्यात आल्याची बाब तपासणीत उघड झाली आहे.
तुकडेबंदीचे उल्लंघन होत असल्यास त्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. नियमबाह्य़ खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असेल तर निबंधक कार्यालयाने खातरजमा करणे अपेक्षित आहे तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना त्यासाठी आवश्यक मुद्रांक शुल्क भरले गेले आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारीही मुद्रांक शुल्क विभागाची आहे. तीनही पातळीवर अनास्था आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या नियमित तपासणीत काही प्रकरणे उघडकीस आली असता ती दडपण्याचे प्रयत्न झाले. यासाठी राजकीय दबावही आणले गेले. याच तपासणीत अम्युझमेन्ट पार्कचाही प्रकार उघडकीस आला होता हे येथे उल्लेखनीय.
सध्या प्रशासकीय वर्तुळात या तुकडेबंदी उल्लंघनाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने सुरू असलेल्या या गैरव्यवहारात अनेक अधिकारी व नेते सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून करण्यात आली आहे.

appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…