चार दिवसांची पोलीस कोठडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव यांची मुले करण उर्फ मोंटू (२२) आणि अर्जुन ऊर्फ चिंटू (१९) हे शनिवारी सकाळी १० वाजता धंतोली पोलिसांना शरण आले. त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी जाधव यांच्यासमक्ष हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची म्हणजे २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
AAP MP sanjay Singh (1)
Delhi Liquor Scam: ‘ईडी’ने हरकत न घेतल्याने ‘आप’ नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर

२१ ऑक्टोबरला फटाके फोडण्याच्या वादातून करण-अर्जुन यांचा मंगल यादव यांच्या बहिणीशी वाद झाला. त्यानंतर मुन्ना यादव व मंगल यादव गटात सशस्त्र हाणामारी झाली. त्यात पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले. तेव्हापासून मुन्ना यादवसह त्यांची मुले व भाऊ फरार आहेत. त्यांची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव व बाला यादवची पत्नी सोनू यादव यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला आहे, तर मंगल यादव गटातर्फे त्यांची बहीण मंजू यादव यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तेव्हापासून मुन्ना यादव, बाला यादव आणि त्यांच्या मुलांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला असून त्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता प्रयत्न करण्याचा त्यांचा मार्ग खुंटला. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांची कोंडी केली होती. तेव्हापासून मुन्ना यादव हे पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शेवटी आज शनिवारी करण व अर्जुन हे वकिलांमार्फत धंतोली पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक केली व न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले. या प्रकरणात मुख्य आरोपी मुन्ना यादव व बाला यादव यांना अटक करायचे आहे. शिवाय घटनेत वापरलेली तलवार जप्त करायची असून साक्षीपुरावे नोंदवायचे असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारने केली. तर बचाव पक्षाने सांगितले की, वडिलांचा पत्ता मुलांना कसा माहीत असणार आहे. शिवाय हे दोन भावांमधील भांडण असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या कारणांमुळे त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २ जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांतर्फे अ‍ॅड. मेघा बुरंगे आणि आरोपींतर्फे अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगांवकर यांनी बाजू मांडली.

पोलिसांचे अपयश

आरोपी दोन महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांनी स्वत:हून एकाही गटातील आरोपींना अटक केली नाही. शेवटी आरोपी आता स्वत:हून पोलिसांना शरण येत आहेत. मुख्य आरोपीही पोलिसांना शरण येतील. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असून राजकीय दबावामुळेच पोलीस आरोपींना स्वत:हून अटक करीत नसल्याची टीकाही राजकीय वर्तुळातून होत आहे.

मुन्ना यादवही येणार शरण!

करण व अर्जुन यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर आता मुन्ना यादव व बाला यादव हेही आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आहे. मुलांची पोलीस कोठडी संपून त्यांची रवानगी कारागृहात झाली की, ते पोलिसांना शरण येतील, असे सांगण्यात येते.