प्रन्यासचे विश्वस्त असताना कागदपत्रांमध्ये फेरफार; अ‍ॅड. परमार यांचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेतील एक भूखंड लाटल्याचा आरोप अ‍ॅड. तरुण परमार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कोहळे नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त असताना त्यांनी भूखंडाच्या कागदपत्रात फेराफार केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

कोहळे हे २००७ ते २०१२ या  दरम्यान नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त होते. त्यावेळी त्यांनी देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेतील २२०० चौरस फुटाचा भूखंड क्रमांक २०१ (इ) चा सौदा केला, परंतु प्रत्यक्ष ताबा घेताना याच भूखंडाच्या शेजारील दुसरा एक हजार चौ.फुटाचा भूखंड त्यांनी हडपला. त्यासाठी त्यांनी गृह निर्माण सहकारी संस्थेचा बोगस अध्यक्ष तयार केला. त्याला दुय्यम सहायक निबंधक कार्यालयात हजर केले आणि २२०० ऐवजी ३२०० चौ.फुटाचा भूखंड अशी नोंद करवून घेतली, असा दावा परमार यांनी केला.

२२०० चौ.फूट भूखंडाचे मालक अशोक जैन होते. या भूखंडाला लागून गृहनिर्माण सहकारी संस्थेचा १००० चौ.फुटाचा भूखंड आहे. कोहळे यांनी १३ मार्च २०११ ला खरेदीचा व्यवहार अशोक जैन यांच्याशी केला. त्यानंतर पंढरी आत्माराम कडू यांना देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेचा बोगस अध्यक्ष बनवून दुय्यम नि. क्रमांक ६ या कार्यालयात हजर केले आणि भूखंड क्रमांक २०१ (इ) हा भूखंड २२०० ऐवजी ३२०० चौ.फूट नोंद करवून घेतली.

हे करीत असताना मूळ भूखंड ३२०० चौ.फुटाचा आहे, परंतु चुकीने त्याची नोंद २२०० चौ.फूट झाली, असे सांगण्यात आले. त्या भूखंडाचे नवीन दुरुस्तीपत्र करवून घेतले, असा आरोप परमार यांनी केला.

माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्रावरून आमदार कोहळे यांचा या व्यवहाराशी थेट संबंध असल्याचे दिसून येते.

त्यामुळे १३ मार्च २०१७ रोजी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार देऊन कोहळे यांना सहआरोपी करण्याची विनंती करण्यात आली, परंतु राजकीय दबावापोटी कोहळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मोरेश्वर घाडगे, डॉ. अशोक लांजेवार, एन.एल. सावरकर उपस्थित होते.

 

बदनामी करण्यासाठी आरोप

दोन महिन्यापूर्वी देखील असेच आरोप झाले होते. राजकीय हेतूने बदनामी करण्यासाठी असे आरोप केले जातात. आरोप करणाऱ्यांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे. माझी पत्नी आणि माझ्या नावावर हा भूखंड आहे. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात ही मालमत्ता दर्शवण्यात आली किंवा नाही हे तपासून पाहिले जाईल.

– सुधाकर कोहळे, आमदार, दक्षिण नागपूर.