गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज खासदार नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांचे निकटचे सहकारी व राज्य इमारत बांधकाम व कामगार मंडळाचे अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव हे दोन्ही भाजप नेते वेगवेगळ्या कारणावरून पक्षात आणि बाहेरही चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र यासंदर्भात पटोलेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मात्र, यादव यांच्यावर बोलणे टाळले.

पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने दानवे नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांसह पक्षातील अनेक नेत्यांना लक्ष्य करीत आहे. पक्षाकडून मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याबाबत दानवे यांनी विचारले असता त्यांनी प्रारंभी या विषयावर बोलणे टाळले.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार

मात्र, नंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्यावेळी पटोले यांची भेट घेणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

पटोले हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी चर्चेसाठी वेळ मागितली होती. मात्र, निवणुका आणि संघटनात्मक बैठकीमुळे वेळ देऊ शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुन्ना यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे व ते फरार आहेत. त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार का, असे दानवे यांना विचारले असता त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. पत्रकार परिषद संपली असे जाहीर करून ते निघून गेले.

पत्रकार परिषद आटोपल्यावर पक्षाचे प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास यांनी मात्र यादव यांना पक्षाने दूर ठेवले असून त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला बोलावले जात नसल्याचे सांगितले.