22 September 2019

News Flash

धक्कादायक! नागपूरमध्ये पोलिसांकडून लाच म्हणून वेश्यांची मागणी

गुन्हा दडपण्यासाठी लाच म्हणून पोलिसांनी आरोपींकडून पैसे स्वीकारल्याचे आतापर्यंत आपण पाहिले आहे.

गुन्हा दडपण्यासाठी लाच म्हणून पोलिसांनी आरोपींकडून पैसे स्वीकारल्याचे आतापर्यंत आपण पाहिले आहे. पण नागपूरमधल्या काही पोलिसांनी तर हद्दच केली आहे. त्यांनी लाच म्हणून शरीरसुखासाठी तीन वेश्यांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांनी अशी मागणी करणाऱ्या दोन पोलिसांच निलंबन केलं आहे तसेच समाज सुरक्षा शाखाच बरखास्त केली आहे.

नागपूरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून दोन पोलिसांनी तीन वेश्या पुरवण्याची व ३५ हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. नागपूर पोलीस आयुक्तांनी दोन पोलिसांना निलंबित करुन समाज सुरक्षा शाखा बरखास्त केली व त्या विभागातील पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली केली.

नागपूरमध्ये एक महिला अशा प्रकारे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करुन तरुणींची सुटका करण्याऐवजी पोलिसांनी उलट तिला सूट देण्याचे ठरवले. त्याबदल्यात तिच्याकडून तीन वेश्या आणि लाचेपोटी ३५ हजार रुपये मागितले.

 

First Published on September 5, 2019 1:19 pm

Web Title: nagpur bribe police demand prostitutes dmp 82