परिणय फुके, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य यांना स्थान
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली ४६ सदस्यीय असलेली भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अनेक नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. पक्षातील अनेक जुन्या सदस्यांना डावलत बजरंगदलासह आणि अपक्ष उमेदवार परिणय फुके यांना भाजपच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा वाद सुरू असताना शिवाणी दाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि मावळते युवा मोर्चा अध्यक्ष बंटी कुकडे यांना मात्र कार्यकारिणीत कुठेही स्थान देण्यात आले नाही.
भाजपच्या आज जाहीर झालेल्या कार्यकारिणीत ३ महामंत्री, १ संघटन महामंत्री, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, ६ संपर्क प्रमुख, १७ उपाध्यक्ष आणि १७ सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्रचार प्रसिद्धी, सहप्रसिद्धी, युवा व महिला कार्यकारिणी, आर्थिक, व्यापारी, सहकार, माजी सैनिक, अल्पसंख्यक मोर्चा कायदा, वैद्यकीय, सीए, व्यापारी , सहकारी, शिक्षक, मच्छीमार, अपंग विकास, ज्येष्ठ कार्यकर्ता, झोपडपट्टी, बेटी बचाव अभियान, क्रीडा प्रधानमंत्री, मुद्रा योजना यासह अनेक आघाडी घोषित केल्या.
उपाध्यक्ष – मेघराम मेनानी, विजय राऊत, किशोर वानखेडे, संजय बंगाले, बाबा वनकर, रमेश सिंगारे, अभय गोटेकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, परिणय फुके, बबली मेश्राम, देवंद्र मेहर, रामभाऊ आंबुलकर, हाजी अब्दुल कदीर, संजय महाजन, संजय ठाकर, नवनीतसिंग तुली, जयप्रकाश पारेख,
सचिव – सुनील मित्रा, गुलाब नाल्हे, योगेश शाहू, अनिल मानापुरे, अ‍ॅड. कांचन करमकर, हबिबूर परहमान, ज्योती जनबंधू, विजय आसोले, सुनील कोठे, नाना उमाठे, आशीष चिमुलवार, श्रीवास्तव, निशांत गांधी, नरेंद्र देवप्रसाद, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, बृजभूषण शुक्ला.
युवा मोर्चा अध्यक्ष – शिवाणी दाणी, महामंत्री हर्षल घाटे, कमलेश पांडे, बाल्या रारोकर.
संपर्क प्रमुख – अक्षय पाटील, नेहल खानोरकर.
कोषाध्यक्ष – मिल गाडगे, रवींद्र देवपुजारी.
महिला मोर्चा अध्यक्ष – नंदा जिचकार, महामंत्री – सीमा ढोमणे.
व्यापारी आघाडी- अध्यक्ष- संजय वाधवानी, महामत्री – रवी वाधवानी.
वाहतूक आघाडी- अध्यक्ष- श्याम सोनटक्के, महामंत्री उदय आंबुलकर.
अनुसूचित- अध्यक्ष- धर्मपाल मेश्राम, महामंत्री- सतीश सिरस्वान.
अनुसूचित जमाती मोर्चा- विजय फकीरचंद कुळमेथी.
अल्पसंख्याक मोर्चा- शेख फिरोज, महामंत्री- सय्याद सादिक
कायदा-संयोजक- अ‍ॅड. नचिकेत व्यास. सहसंयोजक अ‍ॅड. परीक्षित मोहिते.
वैद्यकीय- डॉ. उमेश शिंगणे, सहसंयोजक- डॉ. गिल्लूरकर,
सांस्कृतिक आघाडी- संयोजक महेश तिवारी, सहसंयोजक कुणाल गढेकर, अभय देशमुख, संजय भाकरे.
प्रसिद्धी प्रमुख- चंदन गोस्वामी, सहसंयोजक- संजय चिंचोले, कार्यालय प्रमुख- सुधीर हिरडे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?