News Flash

शहरात केवळ ४२ नवीन करोनाग्रस्तांची भर!

जिल्ह्य़ात २४ तासांत ५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर नवीन ८१ रुग्णांची भर पडली

करोना प्रातिनिधिक छायाचित्र

जिल्ह्य़ात २४ तासांत ५ मृत्यू; ८१ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर नवीन ८१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांत शहरातील केवळ ४२ नवीन रुग्ण आहेत.

जिल्ह्य़ात पहिल्या लाटेत ऑगस्ट २०२० नंतर रुग्ण वाढायला लागले होते. पहिल्या लाटेत  २५ जानेवारी २०२१ रोजी शहरात ९९ तर १५ नोव्हेंबर २०२० रोजी शहरात ५८ रुग्ण नोंदवले गेले होते. त्यानंतर ८ जून २०२१ रोजी शहरात ४६ रुग्ण नोंदवले गेले. बुधवारी ही संख्या आणखी खाली आली. २४ तासांत शहरात ४२, ग्रामीणला ३६, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ८१ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ३१ हजार ९६५, ग्रामीण १ लाख ४२ हजार ५४०, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५८३ अशी  ४ लाख ७६ हजार ८८ रुग्णांवर पोहोचली.

दिवसभरात शहरात २, ग्रामीणला शून्य, जिल्ह्य़ाबाहेर ३ असे एकूण  ५ रुग्ण दगावले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार २७८, ग्रामीण २ हजार २९९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४०१ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ९७८ रुग्णांवर पोहोचली. दिवसभरात शहरात ७ हजार ८२२, ग्रामीण २ हजार ८१३ असे एकूण  १० हजार ६३५  चाचण्या झाल्या.

९७.५० टक्के रुग्ण करोनामुक्त

शहरात दिवसभरात २२३, ग्रामीणला ९९ असे एकूण  ३२२ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २५ हजार ११०, ग्रामीण १ लाख ३९ हजार ३२४ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ६४ हजार ४३४ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या करोनामुक्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.५० टक्के आहे.

विदर्भात १९ रुग्णांचा मृत्यू

विदर्भातील तीन जिल्ह्य़ांत २४ तासांत करोनाचा एकही मृत्यू नसून इतर आठ जिल्ह्य़ांत १९ मृत्यूंची नोंद झाली. याशिवाय दिवसभरात ७०२ नवीन रुग्ण आढळले. नागपूर शहरात २४ तासांत २, ग्रामीणचे ०, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ८१ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील २६.३१ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत १ मृत्यू तर १३४ नवीन रुग्ण आढळले, चंद्रपूरला २ मृत्यू तर १२२ रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू तर ५७ रुग्ण, यवतमाळला २ मृत्यू तर २२ रुग्ण, भंडाऱ्यात ० मृत्यू तर ७ रुग्ण, गोंदियात २ मृत्यू तर २३ रुग्ण, वाशीमला २ मृत्यू तर ८३ रुग्ण, अकोल्यात ० मृत्यू तर ७३ रुग्ण, बुलढाण्यात ४ मृत्यू तर ७४ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १ मृत्यू तर २६ नवीन रुग्ण आढळले.

रुग्णालयांतील रुग्णसंख्या हजाराखाली

शहरात २ हजार १६३, ग्रामीणला ५१३ असे  एकूण २ हजार ७७६  उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ९९० रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर १ हजार ६८८ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:23 am

Web Title: nagpur city records 42 fresh covid 19 cases zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या नव्या शहराध्यक्षांसमोर १ वरून ११ करण्याचे आव्हान
2 घरबसल्या शिकाऊ वाहन परवान्यासाठी ‘आधार’सक्ती
3 पावसाळ्याच्या तोंडावर चेंबरची झाकणे बेपत्ता
Just Now!
X