News Flash

अल्पवयीन चुलत भावाकडून तरुणीवर अत्याचार

मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघडकीस

प्रतिनिधिक छायाचित्र

मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघडकीस

एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने २० वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार केला. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी  बलात्काराचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

पीडित तरुणी ही बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला आहे, तर आरोपी मुलगा हा बाराव्या वर्गात शिकत आहे. ते सख्खे चुतल बहीण-भाऊ आहेत. त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात. ते एकमेकांच्या शेजारी राहात असून बालपणापासून दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दिवाळीच्या वेळी दोघेही एकांतात असताना आरोपी मुलाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला कुणाकडे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी द्यायचा. पहिल्या प्रसंगानंतर ती शांत असल्याने त्याची हिंमत वाढली. त्यानंतर तो वारंवार तिच्यावर अत्याचार करू लागला. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती एक महिन्याची गर्भवती असल्याची बाब निष्पन्न झाली. डॉक्टरांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांनी तरुणीचे बयाण नोंदवून गुन्हा दाखल केला व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा सतरा वर्षांचा असून एप्रिल महिन्यात त्याला १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 5:28 am

Web Title: nagpur crime news 2
Next Stories
1 वाहतूक हवालदाराचा लाच घेतानाची चित्रफीत प्रसारित
2 रस्ते, रेल्वे अपघातांत ठार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ
3 भाजप नगरसेवकांना राजीनामे मागणार
Just Now!
X