29 October 2020

News Flash

आर्थिक अडचणीमुळेच राणे कुटुंबाचा अंत!

मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली

मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली

नागपूर : आपण  पतीला आर्थिक अडचणीत पाहू शकत नव्हतो. त्यामुळे पती व मुलांना मारून आत्महत्या करीत असल्याचे डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती समोर येत आहे.

प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे लेआऊट येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली.  धीरज दिगांबर राणे (४२), त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (३९),मुलगा ध्रुव धीरज राणे (११), मुलगी  लावण्या ऊर्फ वण्या धीरज राणे (५), अशी मृतांची नावे आहेत.  बुधवारी पोलिसांना राणे दाम्पत्य राहात असलेल्या घराशेजारी भूखंडावर इंजेक्शनची बाटली सापडली. त्याद्वारे डॉ. सुषमाने पती व मुलांना झोपेतच विष दिले. त्यानंतर आत्महत्या केली. घटनास्थळावरून  सुषमाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात पतीला दररोज तणावात मरताना बघू शकत नाही, असे लिहिले आहे. त्यामुळे सर्वजण सामूहिकपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून चिठ्ठीच्या शेवटी सर्वाची नावे लिहिली आहेत, अशी माहिती  उपायुक्त निलोत्पल यांनी दिली.

पहाटे रुग्णालयातून विष आणले

सुषमा ही अवंती रुग्णालयात डॉक्टर होती. मृत्यूचा निर्णय झाल्यानंतर तिने मंगळवारी पहाटे ५ वाजता रुग्णालयात जाऊन विषाचे इंजेक्शन आणल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली.

धीरजचे पालनपोषण आत्याने केले

धीरजचे आईवडील त्याच्या बालपणीच वारले. त्यानंतर त्याचे पालनपोषण त्याची आत्या प्रमिला यांनीच केले होते. आर्थिक चणचणीतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा परिसरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:47 am

Web Title: nagpur doctor family suicide rane family suicide due to financial difficulties zws 70
Next Stories
1 पिवळ्या मारबतीची मिरवणूक न काढता दहन
2 कामगारांना अवजारांचे अनुदान बंद, कर मात्र सुरूच
3 उपराजधानीत ४१ दिवसात करोना मृत्यूचे प्रमाण तिप्पट!
Just Now!
X