News Flash

नागपूरची लेक सैन्यदलात अधिकारी

नागपूरच्या लेकीने प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून भारतीय सैन्यदलात  जागा मिळवली आहे

दामिनी प्रकाश यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकाडमी येथून प्रशिक्षण पूर्ण केले

नागपूर : नागपूर शहरासाठी आणखी एक अभिमानाची बाब घडली आहे. नागपूरच्या लेकीने प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून भारतीय सैन्यदलात  जागा मिळवली आहे. दामिनी प्रकाश यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकाडमी येथून प्रशिक्षण पूर्ण केले आणि २९ मे २०२१ ला लेफ्टनन्ट म्हणून भारतीय सैन्य दलात रूज झाल्या आहेत.

पृथ्वी प्रकाश आणि विभावरी प्रकाश यांची कन्या असलेल्या दामिनी यांनी प्रॉव्हिडन्स हायस्कूल, नागपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. एसएफएस कॉलेज नागपूर येथून १२ वी आणि बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, एनसीसीच्या एअर स्कॉड्रनमधून तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना बी आणि सी सर्टिफिकेटमध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली होती. दामिनी यांना एनसीसी प्रशिक्षणादरम्यान इंटर ग्रुप स्पर्धेतील  २२ फायरिंग आणि स्किट शुटिंगमध्ये सुवर्ण पदक मिळाले होते.  एनसीसी स्पेशल एन्ट्री स्किममधून एसएसबीत त्या पात्र ठरल्या. लेफ्टनन्ट दामिनी यांनी त्यांच्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना दिले आहे. एनसीसी ग्रुप हेडक्वॉटरचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन एम. कलिम, नं. २ (महा) एअर स्व्ॉड्रन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन डी. भारत यांनी दामिनी यांचे अभिनंदन केले. यापूर्वी नागपूरच्या दोन युवती वायु दलात नियुक्त झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:25 am

Web Title: nagpur girl become army officer zws 70
Next Stories
1 शहरात केवळ ४२ नवीन करोनाग्रस्तांची भर!
2 राष्ट्रवादीच्या नव्या शहराध्यक्षांसमोर १ वरून ११ करण्याचे आव्हान
3 घरबसल्या शिकाऊ वाहन परवान्यासाठी ‘आधार’सक्ती
Just Now!
X