प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच नागपूर मेट्रो रेल्वेची सेवा सुरू होणार असून तिचा वेग ताशी ९० किलोमीटर असणार आहे. यासंबंधीची तयारी अंतिम टप्यात आहे.

तसेच प्रस्तावित मेट्रो मार्गावरील स्थानकावरील कामे सुरू आहेत. त्याची पाहणी महामेट्रोचे अधिकारी करीत आहेत. मेट्रोचा वेग लक्षात घेतला तर शहरातील सर्वाधिक गतीने सेवा प्रदान करणारी वाहतूक यंत्रणा ठरणार आहे.

सुरुवातीला मेट्रो वर्धा महार्गावरील खापरी ते एअरपोर्ट (साऊ थ) या स्थानकादरम्यान धावणार आहे. पाच किलोमीटरचा हा दैनंदिन प्रवास यात्रेकरूंना करता येणार आहे. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू व्हावे, याकरिता महामेट्रोने हैद्राबाद येथून डबे मागवले. त्यात आवश्यक ते बदल करण्यात आले. आधुनिक सी.बी.टी.सी. सिग्नल प्रणाली लावण्यात आली. नागपूरकरांना मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद मिळावा यासाठी ‘जॉय राईड ’ची संकल्पना मेट्रोतर्फे राबवण्यात येणार आहे. ही ‘जॉय रॉइड’  खापरी मेट्रो स्थानकापासून सुरू होऊ न एअरपोर्ट (साऊ थ) पर्यंत असेल. या दरम्यान न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर थांबा राहील. ‘जॉय राईड’ दरम्यान मेट्रोचा वेग ताशी २५ किमी इतका राहील. यातून मेट्रो प्रवाशांचे अनुभव आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता महामेट्रो भविष्यात त्यात आणखी काही सुधारणा करणार आहे.

एअरपोर्ट (साऊ थ) ते खापरी दरम्यान धावणारी मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा आगामी काळात सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्थानकापर्यंत वाढ वण्यात येणार आहे. यासाठी युद्ध  स्तरावर काम पूर्ण केले जात आहे. या मार्गावर रुळ आणि सिग्नल  प्रणालीचे  काम पूर्ण होताच प्रवासी वाहतूक सुरू होईल.