14 August 2020

News Flash

स्मार्ट सिटी प्रकल्प बंद पाडण्याचा आयुक्तांचा डाव

महापौर संदीप जोशी यांचा आरोप

महापौर संदीप जोशी यांचा आरोप

नागपूर :  पूर्व नागपुरातील १७३० एकर परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जून २०२० पूर्ण होणे अपेक्षित असताना सध्या केवळ पाच टक्के काम झाले आहे. शिवाय ज्यांची घरे या प्रकल्पात गेली त्यांना तिसऱ्या टप्प्यातील मोबदला देऊ नये असे तोंडी आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देऊन काम थांबवले. स्मार्ट सिटीच्या कामातही अनियमितता असून हा प्रकल्प ते बंद करण्याच्या मागे लागले आहेत, असा आरोप   महापौर संदीप जोशी यांनी केला. आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह त्यांनी आज गुरुवारी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला भेट  दिली.

पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर आणि पारडी व भांडेवाडी या भागात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त व महापौर यांच्यामध्ये स्मार्ट सिटीच्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी आणि कृष्णा खोपडे यांनी भरतवाडा या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली.

३ हजार ५०० कोटींचा हा प्रकल्प असून या प्रकल्पासाठी आतापर्यंत १९६ कोटी केंद्र सरकारने, १४८ कोटी राज्य सरकार व शंभर कोटी नागपूर सुधार प्रन्यासने दिले आहे. शाकुर पालंजी या कंपनीकडे स्मार्ट सिटीचा आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी १७ कोटी देण्यात येणार होते. त्यापैकी १० कोटी देण्यात आले आहे मात्र कंपनीने केवळ ५ टक्के काम केले आहे. भरतवाडामधील ज्या लोकांची घरे या प्रकल्पात गेली आहे त्यांचा तिसऱ्या टप्प्यातील मोबदला  देण्यात आला नसल्याचा आरोप  जोशी यांनी केला.

या भागात ५० किमी रस्ते तयार करण्यात आले  असून त्यातील १२.३० किमी रस्त्याची कामे झाली आहेत. २० किमी रस्ते केवळ खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना त्रास होऊ लागला आहे.

काम कसे थांबवले?

स्मार्ट सिटीबाबत ज्या कंपनीने आराखडा (डीपीआर) तयार केला त्या कंपनीला साडे सतरा कोटी देण्यात येणार आहे. त्यातील १० कोटी देत कामाचे कार्यादेश देण्यात आले होते मात्र अजूनही पाच टक्के काम पूर्ण झाले नाही. या प्रकल्पासाठी ४० टक्के मालमत्ता घेण्यात आली आहे. मात्र त्यांना अजूनही रक्कम दिली नाही. आयुक्त तुकाराम मुंढे हे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसताना त्यांनी तोंडी आदेश देत काम कसे थांबवले?

– आमदार कृष्णा खोपडे.भरतवाडा परिसरातील पाण्याच्या टाकीचे अर्धवट झालेले काम.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 1:51 am

Web Title: nagpur municipal commissioner plan to close smart city project zws 70
Next Stories
1 Coronavirus : कारागृहात पुन्हा १२ जण करोनाबाधित!
2 अबब! २.८ किलोमीटर लांब मालगाडी
3 शेततळयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
Just Now!
X