25 September 2020

News Flash

आढावा बैठकांमध्ये अडकले महापालिकेचे प्रकल्प

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना कागदावरच

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना कागदावरच

केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता असूनही  महापालिकेने जाहीर केलेले अनेक प्रकल्प अद्यापही कागदावरच असल्याचे चित्र नागपूर शहरात आहे. चार वर्षांत केवळ बैठका झाल्या, कामांना सुरुवात झाली नाही.

महापालिकेने जाहीर केलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये ऑरेंज सिटी स्ट्री स्ट्रीटचा (पूर्वीची लंडन स्ट्रीट) समावेश आहे. त्याचा गाजावाजा महापालिकेने अनेकदा केला. मात्र, अद्याप त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहर विकासाच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या. काहींचे भूमिपूजन सुद्धा झाले. त्यानंतर ते पुढे सरकले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील खेळांडूसाठी साई केंद्र जागेच्या  वादात अडकले आहे. कचऱ्यापासून विद्युत निर्मिती, जलशुद्धीकरण प्रकल्प, बीओटी तत्त्वावर महालातील बुधवार बाजार, सक्करदरा भागातील बुधवार बाजार, कमाल चौक येथील व्यापारी संकुल असे कितीतरी प्रकल्प सध्या सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

२१३ कोटीची अमृत योजना शहरात सुरू करण्यात येणार आहे. त्यात ४२ पाण्याच्या टाक्यांची निर्मिती होणार आहे. सिमेंट रस्त्याची कामे तीन फेजमध्ये करण्यात येणार आहे.  मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अजून पूर्ण झाली नाहीत. तिसऱ्या फेजसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र त्या कामाला सुरुवात केव्हा होईल हे सांगता येत नाही.

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची घोषणा केली होती. त्याच्या अंमलबजावणीतील दोषामुळे अजूनही अनेक जण पट्टय़ापासून वंचित आहे. शहारातील भूमिगत गटार योजना, कचरा व्यवस्थापनाबाबत नियोजन, प्रधानमंत्री आवास योजना, घरकूल आणि रमाई आवाज योजना, अंबाझरी ओपन थिएटर, जरीपटका मार्केट, लकडगंज फायर स्टेशनची जागा, डिग दवाखाना, रामेश्वरी भागातील सिमेंट विद्युत पोल हटवणे, डिग दवाखाना, नागनदीसह पिवळी आणि पोरा नदीचे सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ग्रीन जीम साहित्य उपलब्ध करून देणे, मत्स्य व्यवसायासाठी बाजाराची निर्मिती, सोख्ता भवनमध्ये व्यापारी संकुल आणि सभा, केळीबाग रोडचा विस्तार, महिला उद्योजिका भवन, शहरातील चित्रकार, शिल्पकारासाठी कलानगराची निर्मिती व आर्ट गॅलरी अशा अनेक प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र  यातील अनेक प्रकल्प  मार्गी लागले नाहीत.

शुक्रवार तलावाच्या काठी खाऊ गल्ली आणि वाठोडा भागात जनावरांसाठी नंदग्रामची निर्मिती केली जाणार होती. मात्र या दोन्ही योजना अजूनही पूर्णत्वास आल्या नाहीत. खाऊ गल्लीवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्यानंतर खव्वयांसाठी गल्ली झाली नाही.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना शहरात राबवल्या जात असून त्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. ऑरेंज सिट्टी प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. शहाराच्या विकासासाठी सुरू असलेले  प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत.   – प्रवीण दटके, अध्यक्ष, प्रकल्प समिती, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:13 am

Web Title: nagpur municipal corporation 2
Next Stories
1 महात्मा फुले जन आरोग्य योजनेतही लूट!
2 शिक्षण संचालक, उपसंचालक हाजीर हो!
3 महिनाभरात मेडिकलमध्ये गर्भजल चाचणी केंद्र
Just Now!
X