21 September 2020

News Flash

कुख्यात साहिल सय्यदच्या घरावर हातोडा

पोलिसांच्या पत्रव्यवहारानंतर महापालिकेची कारवाई

पोलिसांच्या पत्रव्यवहारानंतर महापालिकेची कारवाई

नागपूर : एलेक्सिस रुग्णालयाच्या डॉक्टरला धमकावण्याच्या प्रकरणापासून चर्चेत आलेल्या कुख्यात  साहिल सय्यद याच्या मानकापूर येथील घरावर बुधवारी महापालिकेने बुलडोझर चालवला. एखाद्या पाढंरपेशा गुंडाच्या घरावर बुलडोझर चालवण्याची ही  पहिली घटना आहे. यापूर्वी संतोष आंबेकरच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आला होता.

विविध राजकीय पुढाऱ्यांसोबत छायाचित्र काढून समाजात मिरवणे, त्यानंतर आपल्यामागे राजकीय वरदहस्त असल्याचे सांगून लोकांना धमकावणे, त्यांचे भूखंड, सदनिका बळकावण्याचे काम साहिल सय्यद व त्याची टोळी करायची. त्याच्याविरुद्ध एलेक्सिस, पाचपावली, तहसील, नंदनवन, हुडकेश्वर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, सतरंजीपुरा मशीद समितीने गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार करून साहिल सय्यदने मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूखंड क्रमांक २४४, २४५, बगदादीयानगर, झिंगाबाई टाकळी येथे असलेली जमीन बळकावली.

त्या जागेवर त्याने अतिक्रमण करून घर बांधले, असा दावा केला. या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई करून बनावट दस्तावेज तयार करणे व भूखंड बळकावण्याचा गुन्हा मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल केला.

त्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून साहिल सय्यद या गुंडाने जमीन बळकावून घर बांधले आहे. या बांधकामाला महापालिकेची परवानगी नसून किंवा बांधकाम आराखडा मंजूर नसल्याने योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने साहिल सय्यदला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आठ

दिवसांनी घराविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. बुधवारी दुपारी २.३० वाजतापासून पोलीस बंदोबस्तात त्याचे तीन माळ्याचे घर पाडण्याचे काम सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत घर पाडण्याचे काम सुरू होते, अशी माहिती महापालिका अतिक्रमण विभागाचे निरीक्षक संजय कांबळी यांनी दिली.

लोकांचे घर उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक

संतोष आंबेकर, साहिल सय्यद यांनी लोकांना फसवून, धमकावून व अनधिकृत ताबा घेऊन जमिनी बळकावल्या आहेत. लोकांची घरे उद्ध्वस्त करून त्यांनी माया जमवली असून त्यांचे अनधिकृत बांधकाम असल्यास त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांनी केवळ प्रकरणांचा तपास करून त्यांच्या घरांचे बांधकाम अनधिकृत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेला कळवले. ही महापालिकेची कारवाई असून ती अतिशय योग्य आहे.

– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

 

साहिल सय्यदचे घर पाडताना महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 2:19 am

Web Title: nagpur municipal corporation demolished sahil bunglow zws 70
Next Stories
1 संपत्ती व पाणी करावरील दंड माफ करा
2 Coronavirus : करोनाचा वाढता विळखा; २७ मृत्यू, ६२१ बाधित
3 लोकजागर : स्पर्धा परीक्षेचे त्रांगडे!
Just Now!
X