झोनस्तरावर वॉररुम, स्वतंत्र वार्डवर अद्याप अंमल नाही

नागपूर :  मुंबईतील धारावी व कोळीवाडा  या अतिशय दाटीवाटीच्या वस्त्यांमधील करोनाची साथ नियोजन व समन्वयातून नियंत्रणात आणणारे मुंबई  महापालिके चे आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपूरमधील साथनियंत्रित करण्यासाठी दिलेल्या मंत्राचा विसर स्थानिक यंत्रणेला पडला आहे. झोनस्तरावर वॉररुम स्थापन करण्यासह  तातडीने उपचारासाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्याच्यासूचनेवरही अद्याप अंमल झाला नाही.

नागपुरातील करोना नियंत्रित करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख व  पालकमंत्री नितीन राऊत यांनी  मुंबई महापालिके चे आयुक्त आय.एस.चहल यांच्यासह  यांच्या पथकाला नागपुरात आणले. यात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला या तज्ज्ञांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी  मुंबईत त्यांनी कसे काम के ले याबाबतची माहिती स्थानिक करोना नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिली.  करोना नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवा व त्त्यातून आरोग्य यंत्रणा बळकट करा हा प्रमुख मंत्रही त्यांनी दिला. पाच सप्टेंबरला ही समिती आली होती अठरा दिवसानंतरही स्थानिक यंत्रणेत डेटा संकलनासह अनेक बाबतीत असमन्वय दिसून येतो.

यंत्रणेत सुधारणा करता येते. नागपुरात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष  वस्त्यांना भेटी वाढवाव्या, असे आवाहन चहल यांनी के ले  होते. तत्कालीन आयुक्त वस्त्यां-वस्त्यांमध्ये फिरत होते. ते गेल्यावर एकही वरिष्ठ अधिकारी कक्षाबाहेर पडला नाही.

करोनाची साखळी तोडण्यासाठी बाधितांना अलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. ज्यांच्या घरी सोय नाही, स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत अशा बाधितांना त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना अलगीकरण कक्षांमध्ये ठेवा, असे चहल म्हणाले होते. महापालिके ने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष

के ले. त्यांच्या पाच रुग्णालयात खाटा रिकाम्या असूनही बाधितांना तेथे  पाठवलेच जात नाही. घरी विलगीकरकणात असणाऱ्यांची विचारपूसही के ली जात नाही. या समितीने सर्वात महत्त्वाची  के लेली सूचना  रुग्णांना  तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करून  देण्याची होती. मात्र अजूनही रुग्णांना खासगी व सरकारी दवाखान्यास सहज खाटा मिळत नाही. झोनपातळीवर ‘वॉर रुम ‘ बाबत अद्यापही  विचार सुरू झाला नाही.

रुग्ण आल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार व्हावा म्हणून स्वतंत्र वॉर्डाची सूचना करण्यात आली होती. त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

अशा आहेत समितीच्या प्रमुख सूचना

*    चाचण्यांची संख्या वाढवा

*    रुग्णवाहिकांची संख्या वाढवा

*    खासगी, सरकारी  इस्पितळात ‘वॉर रूम’ उघडा

*    गंभीर रुग्णाच्या  उपचाराबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्हीत साठवा

*    प्रत्येक विषाणू  बाधिताचे विश्लेषण

*    खाटांचाी ऑनलाईन  उपलब्धता

*    रुग्णालयातील स्वच्छतागृहाचे दर चार ते पाच तासांनी निर्जंतुकीकरण

*    समाजमाध्यमांवरील चुकीच्या बातम्यांचे खंडण

चहल समितीने सांगितलेल्या बहुतांश गोष्टी आम्ही पूर्ण के ल्या आहेत. वेळोवेळी त्यांचा आढावाही घेतला जात आहे. या आठवडय़ात  आरोग्य मंत्री  राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा दौरा असून ते नागपुरातील स्थितीचा आढावा घेणार आहेत.

– नितीन राऊत, पालकमंत्री.

तात्काळ  रुग्णवाहिका उपलब्ध -जिल्हाधिकारी

बाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ  रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे.  गरजूंनी  रुग्णवाहिके साठी  टोल फ्री क्रमांक १०२ व १०८  वर  संपर्क  साधावा, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे  यांनी सांगितले. चहल समितीने के लेल्या सूचनांवर  टप्प्या टप्प्याने अंमल सुरू असल्याचे ते म्हणाले.