News Flash

करोनामुक्तांची संख्या एक लाखाच्या उंबरठय़ावर

२४ तासांत ७ मृत्यू; ११४ बाधितांची भर

(संग्रहित छायाचित्र)

येथील शहरी व ग्रामीण भागात दिवसभरात ७ करोनाबाधितांचा मृत्यू तर ११४ नवीन बाधितांची भर पडली. दिवसभरात जिल्ह्य़ात १५५ व्यक्ती करोनामुक्त झाल्याने आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ९९ हजार ९८८ वर पोहचली आहे.

दैनिक करोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील ९५, ग्रामीणच्या ६० अशा एकूण १५५ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरी भागातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७९ हजार ८३, ग्रामीण भागातील करोनामुक्तांची संख्या २० हजार ९०५ अशी एकूण ९९ हजार ९८८ वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत जिल्ह्य़ात करोनामुक्तांचे प्रमाण ९३.८३ टक्के आहे, तर दिवसभरात शहरील भागातील १, ग्रामीण ३, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील दगावलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ४७८, ग्रामीण ५९४, जिल्ह्य़ाबाहेरील ४५३ अशी एकूण ३ हजार ५२५ वर पोहचली आहे. तर २४ तासांत शहरात ९०, ग्रामीणला २३, जिल्ह्य़ाबाहेरील १ अशा एकूण ११४ व्यक्तींना करोना असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोना बाधितांची संख्या ८४ हजार ४१, ग्रामीण २१ हजार ८८५, जिल्हाबाहेरील ६३५ अशी एकूण १ लाख ६ हजार ५६१ वर पोहचली आहे.

सक्रिय बाधितांची संख्या ३,०४८ वर

येथील शहरी भागात सोमवारी २ हजार ४८० तर ग्रामीणला ५६८ असे एकूण ३ हजार ४८ सक्रिय करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले. त्यातील २ हजार २०२ रुग्ण गृहविलगीकरणात तर ७३२ जोखमीतील रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे, तर ११४ रुग्णांवर सोमवारी सायंकाळी उपचाराची प्रक्रिया सुरू होती.

विदर्भातील दैनिक मृत्यू

(१६ नोव्हेंबर २०२०)

जिल्हा  मृत्यू

नागपूर  ०७

वर्धा ०३

चंद्रपूर  ०२

गडचिरोली   ०१

यवतमाळ   ०१

अमरावती            ०१

अकोला                ०१

बुलढाणा               ०१

वाशीम                   ००

गोंदिया                   ०१

भंडारा                    ००

एकूण                    १८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:00 am

Web Title: nagpur number of corona free is on the threshold of one lakh abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वार अखेर उघडले
2 ‘वॉकर’च्या निमित्ताने कॉरिडॉरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
3 वीज कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
Just Now!
X