माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. शिक्षण मंडळाने यंदा तोंडी परीक्षेसह क्रीडा आणि कलावंत विद्यार्थ्यांनाही वाढीव गुण दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झालीआहे. रमना मारोती परिसरातील जे.पी. इंग्लिश स्कूलची समीक्षा पराते या विद्यार्थिनीने ९९.४ टक्क्यांसह घवघवीत यश मिळवले आहे.

आज बुधवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होताच करोना काळातही काही विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली. शिक्षण मंडळाने क्रीडा आणि कलावंत विद्यार्थ्यांनाही वाढीव गुण दिले. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी ९९ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे दिसून आले. याशिवाय यंदा विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे प्रत्येक विषयात २० गुण मिळाल्याने काठावर असणारे विद्यार्थीही उत्तीर्ण झालेत. यामुळे शाळांच्या निकालातही वाढ झाली आहे. सोमलवार निकालसचा ऋषिकेश चव्हाण ९८.४० टक्के, साऊथ पॉईंट स्कूलची हिमांशी गावंडे ९८.४० याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून गुणांनी यश मिळवले.

२,६९० शाळांचा निकाल शंभर टक्के

वाढीव गुणांमुळे  नागपूर विभागातील २६९० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील सोमलवार रामदासपेठ, निकालास, हडस, बी.आर. मुंडले, पंडित बच्छराज व्यास या शाळांनी आपली निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

दिव्यांगांचे नेत्रदीपक यश

दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. कुर्वेज हायस्कूल दीक्षाभूमी परिसरातील वेदिका गेडाम या विद्यार्थिनीने  ८९.६० टक्के गुण मिळवले आहे. वेदिकाला संगीत विषयात आवड असून यात भविष्य करायचे असल्याचे तिने सांगितले. डॉक्टर व्हायचेय

वर्षभर सातत्याने अभ्यास, अधिकाधिक सरावाद्वारे उजळणीसह अभ्यास पूर्ण केला. या सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच यश मिळाल्याचे ऋषिकेश चव्हाण म्हणाला. चित्रकला आणि वाचन या त्याच्या आवडीच्या गोष्टी आहेत. दहावीतही त्याने वाचन कायम ठेवले होते. एमबीबीएस आणि त्यानंतर एम.एस. करण्याची त्याची इच्छा आहे.

– ऋषिकेश

शिकवणीविनाही यश शक्य

सर्वत्र शिकवणीचे आकर्षण असले तरी ९४.४ टक्क्यांनी उत्तीर्ण होणाऱ्या समीक्षा पराते हिने कुठल्याही शिकवणीशिवाय यश मिळवल्याचे सांगितले. नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे समीक्षा सांगते.

–  समीक्षा