नागपूर पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र तपास कक्ष स्थापन करण्याचा निर्णय; देशांतर्गत पहिलाच प्रयोग

दिवसेंदिवस वाढणाऱ्या संपत्तीविषयक गुन्ह्य़ांचे प्रमाण लक्षात घेता गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्या धर्तीवर नागपूर पोलीस आयुक्तालयाने आता स्वतंत्र तपास कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून केंद्राचे नाव ‘प्रॉपर्टी ऑफेन्स सेल’ असे असणार आहे. संपत्तीविषयक गुन्ह्य़ांसाठी स्वतंत्र तपास कक्ष निर्माण करणारे नागपूर पोलीस आयुक्तालय हे देशातील पहिले ठरेल.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
Constitution of India
संविधानभान: संविधानाचे चिरंतन मूल्य
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

शहराचा झपाटय़ाने विकास होत आहे. त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले असून लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. यात दोन प्रकारची फसवणूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते. एक आर्थिकपणे फसवणूक करणे आणि दुसरे म्हणजे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक करणे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्य़ांचा तपास पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येतो. तर दामदुपटीचे दामिष दाखवून आर्थिक फसवणूक करणे आदी स्वरुपाच्या गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा ही स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, बनावट दस्तावेज तयार करणे, संपत्ती बळकावणे या गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे अशा प्रकरणांचा तपास पोलीस ठाण्यांमधूनच होतो आणि अनेक वष्रे तपास प्रलंबित राहतो.

या सर्व बाबींचा अभ्यास करून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी संपत्तीविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर काम सुरू झाले. ‘प्रॉपर्टी ऑफेन्स सेल’ अंतर्गत जमीन, भूखंड आदी स्वरूपाच्या गुन्ह्य़ांसह इतर कोणत्या बाबींचा तपास करण्यात येऊ शकतो, याचा अभ्यास सध्या सुरू असून लवकरच कक्ष तयार होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. संपत्तीविषयक गुन्ह्य़ांसाठी अशाप्रकारचे स्वतंत्र तपास यंत्रणा निर्माण करणारे नागपूर पोलीस आयुक्तालय पहिलेच असेल.

स्वतंत्र ‘प्रॉपर्टी ऑफेन्स सेल’ लवकरच

नागपूर शहराचा विकास झपाटय़ाने होत असून जमिनीचे भाव वाढत आहेत. मोठय़ा शहरात आपले घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. त्यासाठी ते आयुष्यभराची मिळकत जमीन, भूखंड, गाळा खरेदीमध्ये गुंतवितात. मात्र, लोकांची फसवणूक होते आणि ते रस्त्यावर येतात. ही फसवणूक टाळता यावी आणि झालेल्या फसवणुकीच्या प्रकारांचा झपाटय़ाने तपास व्हावा, हा स्वतंत्र ‘प्रॉपर्टी ऑफेन्स सेल’मागचा उद्देश आहे. त्यावर अभ्यास सुरू असून दोन दिवसांनी सेलसंदर्भात आढावा घेण्यात येणार असून लवकरच ते कार्यान्वित करण्यात येईल.

– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, नागपूर

मागील वर्षीच्या तुलनेच ४१ टक्क्यांनी वाढ

जानेवारी-२०१६ या एका महिन्यात फसवणुकीची एकूण २४ प्रकरणे दाखल झालेली होती. यंदा जानेवारी-२०१७ या एका महिन्यात ४१ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर डिसेंबर-२०१६ या महिन्यात ३३ गुन्हे दाखल आहेत. मागील

वर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ातील वाढ ही ४१ टक्के इतकी आहे. फसवणुकीच्या एकूण गुन्ह्य़ातील संपत्तीविषय गुन्ह्य़ांचे प्रमाण हे निम्मे असल्याचे सांगितले जाते.