News Flash

गुंडांच्या टोळ्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’ची कारवाई सुरूच राहणार

महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोबाईल अ‍ॅप तयार केलेले आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची माहिती; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

गुन्हा घडण्यासाठी शिक्षण, रोजगार, व्यसन, समाज, परिस्थिती, वातावरण आदी सर्व गोष्टी कारणीभूत असतात. परंतु समाजात गुन्हेगार निर्माण होऊ नयेत, याची जबाबदारी पोलिसांवर असून त्यासाठी नागपूर शहर पोलीस सर्वप्रकारचे प्रयत्न करीत आहे. क्षुल्लक कारणांवरून आणि कौटुंबिक वादातून घराच्या आतमध्ये घडणाऱ्या गुन्ह्य़ांवर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. मात्र, समाजात दादागिरी करून अवैध धंदे करणारे गुंड आणि त्यांच्या टोळ्यांविरुद्ध पोलीस ‘मोक्का’ आणि महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात येत असून यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. नागपूरकर चांगले आहेत. शहरवासीयांना चांगली सुविधा आणि पोलीस ठाण्यात चांगले वातावरण मिळावे, याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्यात ‘फ्रंट सव्‍‌र्हिस’ डेस्कच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्यात येईल. याशिवाय दहशत निर्माण करून अवैध धंदे करणारे गुंड व त्यांच्या टोळयांवर मोक्का, एमपीडीएची कारवाई करण्यात येत असून पुढे कारवायांमध्ये वाढ करण्यात येईल. लोकांना सुरक्षित शहर देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे डॉ. वेंकटेशम म्हणाले.

महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोबाईल अ‍ॅप तयार केलेले आहेत. त्यांनी ते आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. तेथील सूचनेवरून पोलिसांना माहिती द्यावी. मोबाईलमध्ये जीपीएस सव्‍‌र्हिस सुरू ठेवावी. जेणेकरून पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहित होऊ शकेल आणि अडचणीच्या वेळी तत्काळ पोलिसांची मदत पोहोचेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या सुरक्षेचा प्रष्टद्धr(२२४)्ना सोडविण्यात येऊ शकते. गुन्हेगारी नियंत्रण मिळविण्यासाठी बीट पोलिसिंग सुरू करण्यात आले आहे. बीट मार्शल किंवा प्रमुख आपापल्या परिसरातील चांगल्या लोकांची ‘स्थानिक सल्लागार समिती’ तयार करून तेथील समस्या सोडविण्यात येईल. तसेच  गुन्हे प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवण्यात येईल. झोपडपट्टय़ांमध्ये दारूच्या व्यसनातून अनेक गुन्हे घडताना दिसत असल्याने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लोकांचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पोलीस हवालदार ते आयुक्तांपर्यंत सुसूत्रता निर्माण केली जाईल. पोलिसांवर होणारे हल्ले चुकीचे आहेत, असेही डॉ. वेंकटेशम यावेळी म्हणाले.

आपल्यासह सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त दर आठवडय़ाला पोलीस ठाण्याला भेट देत असून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. नागरिकांनी अडचणीच्या वेळी १०० क्रमांकावर संपर्क करावा. इतर समस्यांसाठी नागरिक ९५६१०००१०० या क्रमांकावरही संपर्क करू शकतात, असेही ते म्हणाले.

लोकांनी सीसीटीव्ही लावावे

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत शहरा2च्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यातून वाहतूक व्यवस्था सांभाळण्यात आणि कारवाई करण्यास सहकार्य होईल. परंतु नागरिकांनीही स्वत:चे घर, इमारतींमध्ये स्व:खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन करून पोलीस आयुक्तांनी पोलिसांमार्फत लोकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जनजागृती करण्यात येईल, असेही सांगितले.

वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज

शहरात सध्या मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद असून नागरिकांना वाहतुकीचा त्रास होत आहे. परंतु वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रशासन, महापालिकेशी संपर्क करून उपाययोजना करण्यात येत आहेत. शिवाय रस्त्यांवरील फेरीवाले, बाजार यांच्यावरही पोलिसांची करडी नजर आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण बघता हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येत असून नागपूरकर आता हेल्मेटचा वापर करू लागले आहेत, असेही डॉ. वेंकटेशम म्हणाले.

दाभा येथे पोलिसांसाठी ‘स्मार्ट टाऊनशिप’

पोलीस कल्याणासाठी पोलीस दलाकडून अनेक उपाय योजण्यात येत असून कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारचे विशेष सहकार्य लाभत असून दाभा येथील २४ एकर जागेत ‘स्मार्ट टाऊनशिप’ निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी पोलिसांसाठी निवासी संकुलांसोबत खेळाचे मैदान, रुग्णालय, बगिचा, व्यायामशाळा, संगणक केंद्र, कौशल्य विकास केंद्र आदी सुविधा निर्माण करण्यात येतील. याशिवाय महिला पोलिसांना घर आणि काम दोन्ही एकाववेळी सांभाळावे लागत असल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडविण्यात येतील, याचेही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:39 am

Web Title: nagpur police commissioner dr k venkatesham visit loksatta office
Next Stories
1 टाटांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची प्रदर्शनातून ओळख
2 ‘चलनकल्लोळ’चा रोजंदारी कामगार क्षेत्रावर परिणाम
3 अस्वच्छता अन् साथीच्या आजारांचा विळखा!
Just Now!
X