27 October 2020

News Flash

गुन्हेगारी सोडून द्या, अन्यथा पोलिसी खाक्या दाखवू!

गुंडांना बोलावून पोलीस आयुक्तांचा दम

अमितेश कुमार

गुंडांना बोलावून पोलीस आयुक्तांचा दम

नागपूर : पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंड व पांढरपेशा गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. पोलीस आलेखावरील गुंडांना पोलीस ठाणे व पोलीस उपायुक्त कार्यालयात बोलावून गुन्हेगारी सोडा, अन्यथा पोलीस खाक्या दाखवण्यात येईल, असा इशारा दिला जात आहे.

पोलीस आयुक्तांच्या या रौद्ररूपामुळे शहरातील गुंडांमध्ये धडकी भरली आहे. मुंबई व पुण्यापेक्षाही उपराजधानीत खुनाचे प्रमाण अधिक आहे.

त्याशिवाय राज्यात नागपूरचे गुन्हेगारीचे प्रमाण खूप असून ते नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी पोलीस आयुक्तांवर आहे. यामुळे त्यांनी पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांची यादीच मागवली. त्याशिवाय क्रिकेट सट्टा, हवाला, वाळू तस्करी अशा  गुन्हेगारांचीही यादी तयार केली. त्यानुसार प्रत्येकाला पोलीस ठाण्यात किंवा पोलीस उपायुक्त कार्यालयात बोलावून  प्रामाणिकपणे गुन्हेगारीचा मार्ग सोडण्यास सांगण्यात आले. यानंतरही ते न सुधारल्यास त्यांच्याविरुद्ध पोलीस खाक्यानुसार कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे बजावण्यात आले.

याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मटका, जुगार, वाळू तस्करी, गोवंश तस्करी, हवाला आणि क्रिकेट सट्टा शहरात चालू देणार नाही. यातून मिळणाऱ्या पैशातूनच शहरात इतर गुन्हे घडतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:36 am

Web Title: nagpur police commissioner warn goons zws 70
Next Stories
1 करोना संक्रमण कमी होत असल्याचे संकेत
2 वन खात्याचाही आता स्वतंत्र ध्वज
3 परीक्षेचा चौथा दिवसही गोंधळात
Just Now!
X