News Flash

दहा दाम्पत्यांविरुद्ध गुन्हे; २० जणांना अटक

इंग्लंडमध्ये पाठवणाऱ्या दहा दाम्पत्यांविरुद्ध नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले

प्रतिकात्मक छायाचित्र

इंग्लडमधील बेपत्ता तरुण

बनावट दस्तावेज तयार करून मुलांना इंग्लंडमध्ये पाठवणाऱ्या दहा दाम्पत्यांविरुद्ध नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून या प्रकरणात एकूण २० जणांना ताब्यात घेतले आहे.

इंग्लंडमध्ये गेलेले नागपुरातील तरुण बेपत्ता असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर गुन्हे शाखेने आरोपींची धरपकड सुरू केली. राजेंद्र अटवाल, गुरुमित अटवाल, रुलडासिंग गुज्जर, परमित गुज्जर, जर्नलसिंग, सुरिंदर सिंग, पियारासिंग, जसविंदरसिंग कौर, सतवीरसिंग धोतरा, परमजित धोतरा, मनजितसिंग धोतरा, कुलजित धोतरा, निशांत सिंग, सतवंत सिंग, काश्मीर सिंग, मनजित सिंग, अजितसिंग, निर्मल सिंग, बलबिरसिंग मुलतानी आणि जसविंदर कौर मुलतानी सर्व रा. टेका नाका, पाचपावली अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी बनावट दस्तावेजाच्या आधारे पासपोर्ट तयार करून मुलांना इंग्लंडमध्ये नेत असत व तेथून परत येत असे. २००७ पासून हा प्रकार सुरू होता. यासाठी ते ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयातून ‘सिझन व्हिसा’ घेत असत. आतापर्यंत दहा दाम्पत्यांनी एकूण ६२ मुलांना इंग्लंडमध्ये नेले. त्यातील काही भारतात परतले. मात्र, उर्वरित परतले नव्हते. दिल्ली उच्चायुक्त कार्यालयाने सप्टेंबर २०१७ ला नागपूर पोलिसांना पत्र पाठवून प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. पोलिसांच्या तपासात आरोपींनी बनावट दस्तावेज तयार करून मुलांना पाठवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या विरुद्ध भादंविच्या ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२०, ४७४, ३४ आणि पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ अंतर्गत पाचपावली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एका तरुणाकरिता दोन लाख रुपये

इंग्लंडला पाठवण्यात आलेले तरुण १८ ते २५ या वयोगटातील आहेत. एका तरुणाला पाठवण्यासाठी आरोपींनी दोन लाख रुपये व आवश्यक खर्च अशाप्रकारे शुल्क आकारले असावे, असे चौकशीत पुढे येत आहे. चौकशीअंती बेपत्ता तरुणांच्या कुटुंबाचा शोध घेतला जाईल, असेही बोडखे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:34 am

Web Title: nagpur police file complaints on 10 couples in passport scam
Next Stories
1 अभिनयाचे पारितोषिक पाहणे सम्यकच्या नशिबी नव्हते
2 रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांचा ऑनलाईन परतावा विलंबाने
3 मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्य़ात  ७० टक्के निधीच खर्च
Just Now!
X