28 September 2020

News Flash

अनुष्काच्या घरात सापडला डायनॉसोर, नागपूर पोलीस म्हणतात वन-विभागाला पाठवू का??

अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्याच्या लॉकडाउन काळात आपल्या मुंबईच्या घरात राहत आहेत. लॉकडाउन काळात विराट-अनुष्का सोशल मीडियावर विविध प्रकारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनुष्का शर्माने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, I spotted …. A Dinosaur on the loose अशी कॅप्शन देत विराटचा डायनॉसोर स्टाईलमध्ये चालताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अनुष्काच्या या व्हिडीओला दिवसभरात नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलने अनुष्काच्या या व्हिडीओवर एक भन्नाट कमेंट करत सर्वांची मनं जिंकून घेतली.

अवघ्या काही मिनीटांमध्ये अनुष्काच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या घरातल्या बाल्कनीत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 8:43 pm

Web Title: nagpur police hilarious reply to anushka sharma video psd 91
Next Stories
1 व्होडाफोन युजर्सना झटका, दुप्पट डेटा ऑफर देणारे ‘ते’ दोन प्लॅन झाले बंद
2 ‘जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर’ ! 90 वर्षीय आजीबाईंच्या नावावर आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
3 Viral Video: ही कल्पना वापरुन घरच्या घरी तुम्ही स्वत:च कापू शकता स्वत:चे केस
Just Now!
X