News Flash

रेल्वे प्रवास भाडय़ापेक्षा वाहनतळाचे भाडे जास्त

मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरील वाहनतळाचे कंत्राट काही महिन्यापूर्वी देण्यात आले.

कंत्राटदाराकडून मनमानी, मासिक पास देणे बंद

रेल्वेची मासिक पास घेऊन नागपूरहून आसपासच्या गावाकडे जाणे-येणे (अप-डाऊन) करणाऱ्यांना नागपूर मध्यवर्ती स्थानकावरील वाहनतळावर मासिक पास देण्यात येत नाही. त्यामुळे गरजूंना प्रवासभाडय़ापेक्षा दुचाकी ठेवण्यासाठी अधिक खर्च सोसावा लागतो.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नागपूरहून भंडारा, वर्धा, तुमसर, काटोल, नरखेड तसेच इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेगाडी वेळेत पडकणे आणि गाडीने नागपुरात पोहोचल्यावर घरी लवकर पोहचणे यास प्राधान्य असते. हे उद्दिष्ट साध्य करणे ऑटोरिक्षा किंवा स्टारबसने शक्य होत नाही. त्यामुळे नियमित प्रवास करणारे बहुतांश प्रवासी स्वत:च्या दुचाकीने स्थानक गाठत असतात. स्थानकावरील वाहनतळावर दुचाकी ठेवून ते प्रवासाला निघतात. येथेच त्यांची कोंडी करून आर्थिक लूट केली जात आहे.

मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरील वाहनतळाचे कंत्राट काही महिन्यापूर्वी देण्यात आले. वाहनतळाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४० टक्के जागेवरील वाहनांसाठी मासिक पासेस वितरित करणे बंधनकारक आहे, परंतु नवीन कंत्राटदाराने काही दिवसात मनमानी सुरू केली आहे.

त्याने वेगवेगळे कारणे देत वाहनतळाचे मासिक पास देणे बंद केले. कधी तो पास संपल्याचे तर कधी वाहनतळावर जागा नसल्याचे कारण पुढे करत मासिक पास देण्याचे टाळतो. कंत्राटदाराने रेल्वे प्रवाशांना ३०० रुपयांत वाहनतळाचे मासिक पास देणे अपेक्षित आहे, परंतु तो पास संपल्याचे सांगून शेकडो प्रवाशांना वाहनतळाचे रोजच्या रोज शुल्क भरण्यास भाग पाडतो. शहरापासून सुमारे ३० ते ६० किमी दरम्यान प्रवास करणारे शेकडो प्रवाशांना याची झळ बसू लागली आहे. त्यांना रेल्वे प्रवासापेक्षा वाहनतळाचे शुल्क अधिक भरावे लागत आहेत. नागपूर ते वर्धा, भंडारा,आणि अन्य ठिकाणी  दररोज ये-जा करणाऱ्यांचे मासिक पास ४५० रुपये आहे. त्यानुसार एका दिवसाचे भाडे १५ रुपये पडते. वाहनतळावर दुचाकी ठेवण्यासाठी दररोज २० रुपये द्यावे लागते े. अशाप्रकारे प्रवासभाडय़ापेक्षा वाहनतळावरील शुल्क अधिक भरावे लागते. वाहनतळ कंत्राटदारामुळे अशी स्थिती उद्भवल्याने नियमित प्रवास करणारे शेकडो प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

रेल्वेचे सामान्य श्रेणीतील प्रवासाचे मासिक पास नियमित प्रवास करणाऱ्यांना दिले जाते. मासिक पासवर १५० किमी अंतरापर्यंत प्रवास करता येते. त्यापेक्षा अधिक अंतराचे मासिक पास मिळत नाही. नागपूर ते गोंदिया, पांढुर्णा, धामगाव, पुलगाव, हिंगणघाटपर्यंत नागपूरहून मासिक पासने लोक जाणे-येणे करतात.

नागपूर रेल्वेस्थानकावरून इतवारी, अजनी रेल्वे, कळमना रेल्वेस्थानकांवरून अप-डाऊन करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने वेळेची बचत करण्यासाठी दुचाकी वाहनांचा वापर अधिक होतो.

रेल्वेस्थानकावरील दुचाकी वाहनतळाचे मासिक पास ३०० रुपयांचे आहे. स्थानकावर दुचाकी वाहनांसाठी पहिल्या आठ तासांकरिता १० रुपये, १६ तासांकरिता २० रुपये, २४ तासांकरिता ३५ रुपये आणि त्यानंतर एक तास जरी अधिक झाला तर ७० रुपये आकारण्यात येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:21 am

Web Title: nagpur railway station parking fees
Next Stories
1 वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला
2 दिल्लीकरांना अतिरिक्त गुण, इतरांना का नाही?
3 नक्षलवाद्यांचा नवा ‘विस्तार झोन’; हिंसक कारवाया वाढविण्याची योजना
Just Now!
X