कोलार, वेणा नदीला पूर,  दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नागपूर : शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात गुरुवारी अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली आहे. मागील आठवडय़ात दडी मारून बसलेल्या पावसाने आता उग्ररूप धारण के ले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर शहरापेक्षा ग्रामीण भागाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवस पावसाने शहराकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे तापमानात वाढ होऊन वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला होता. गेल्या दोन दिवसांपासून सक्रि य झालेल्या मोसमी पावसाने बराच दिलासा दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून रिमझिम असलेला पाऊस बुधवारी मुसळधार बरसला. तर गुरुवारी देखील रिमझिम आणि मुसळधार पाऊस झाला. मेडिकल चौकात पाणी साचल्यामुळे वाहतूकदारांची चांगलीच तारांबळ उडाली. तर धंतोलीमध्ये रुग्णालय परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

मानकापूर परिसरात जावेद उल्ला नामक व्यक्तीच्या घरात पाणी शिरले. तर हुडके श्वरमधील शरयू सदनिके त पाणी शिरल्याने अग्निशमन विभागाला बोलवावे लागले. शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरू असल्याने खोदलेल्या रस्त्यावर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी एकाच भागातून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची ही स्थिती कायम राहील, असे सांगितले आहे.

मेडिकलमधील टीबीचा एक वार्ड बंद

मेडिकलच्या एका टीबी वार्डालाही गळती लागली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला या वार्डाचे स्टक्चरल ऑडिट करण्याची गरज असल्याचे पत्र विभागाला दिले गेले. त्यामुळे खबरदारी म्हणून हा वार्ड बंद करत येथील रुग्ण इतर वार्डात दोन दिवसांपूर्वी हलवले गेले आहेत.

कोलार नदीला पूर

सावनेर तालुक्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोलार नदीला आलेल्या पुरामुळे काही कु टुंब नगर परिषद शाळेत स्थानांतरित करण्यात आले. कळमेश्वर तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ७९.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कळमेश्वर-गोवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्यामुळे शेतमजूर नाल्याच्या काठावर अडकले. पुराचे पाणी लगतच्या वस्तीमध्ये शिरले. तसेच तालुक्यातील शेती जलमय झाली. धापेवाडा येथील चंद्रभागेलाही पूर आला. खडकनाल्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक खोळंबल्यामुळे वळणमार्गाने त्यांना वाट करून देण्यात आली.

मुंबई-नागपूर रेल्वेसेवा विस्कळीत

मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस झाल्याने तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याने मुंबई-नागपूर दरम्यानची रेल्वेसेवा गुरुवारी विस्कळीत झाली. दुरान्तो एक्सप्रेसला इगतपुरीपासून बऱ्याच दूर थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर विदर्भ, हावडा मेल रद्द करण्यात आली असून सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकमध्ये थांबवण्यात आली. पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. मुंबई-नागपूर दुरान्तो एक्सप्रेस इगतपुरीपासून १८ किलोमीटरवर सुमारे दहा ते १२ तास थांबवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावर बुधवारी रात्री कसारा घाटात दरड कोसळली. त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या होत्या. सेवाग्राम एक्सप्रेसला नाशिकमध्ये थांबवण्यात आली. प्रवाशांची चांगली पंचाईत झाली.

दरम्यान, शुक्रवारीसाठी सीएसटीएम-गोंदिया सुपरफास्ट स्पेशल (विदर्भ एक्सप्रेस), सीएसटीएम-हावडा स्पेशल (मेल) आणि हावडा-सीएसटीएम (मेल) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.  सीएसएमटी-हावडा स्पेशल (गीतांजली एक्सप्रेस) वसई रोड-नंदूरबार-जळगाव मार्गे आणि पुरी-एलटीटी उत्सव स्पेशल जळगाव-नंदूरबार-वसई मार्गे वळवण्यात आली. सीएसटीएम- नागपूर स्पेशल (सेवाग्राम) नाशिक येथे थांबण्यात आली. येथून ही गाडी उद्या, परत पाठवण्यात येणार आहे.

राधाकृष्ण मंदिराला पुराचा वेढा

दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे वेणा नदीला पूर आला. नदीच्या मधोमध श्री राधाकृ ष्ण मंदिर आहे. या मंदिरात एक वेडसर इसम झोपला होता. मंदिरासभोवताल पुराणे पाणी झाल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण के ले. दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे नाटय़ चालले. बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने त्याला पुराच्या वेढय़ातून बाहेर काढले. रायपूर निवासी मुन्ना बानिया हा ५० वर्षीय मानसिक रुग्ण आहे. रोजच्याप्रमाणे दुपारी जेवण करून तो या मंदिरात जाऊन झोपला. दुपारी मुसळधार पाऊस सुरू आला आणि पाहता पाहता पावसाने वेणा नदी तुडुंब भरली. मंदिराच्या छतापर्यंत पाणी पोहोचले. छतावर एका महाराजांची मूर्ती असून याठिकाणी छोटासा कळस करून मंदिर तयार करण्यात आले आहे. पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर हा इसम जागा झाला. काही ग्रामस्थांना तो दिसताच त्यांनी त्याला वर येण्यास सांगितले. तो मंदिराच्या छतावरील छोटा कळस असलेल्या मंदिरात जाऊन बसला. ठाणेदार सर्ाीन दुर्गे, पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, तहसीलदार संतोष खांडरे, ग्रामसेवक प्रदीप वाभीटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शेवटी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, सुजित जंबेली यांच्या नेतृत्वात २३ जवानांचे पथक याठिकाणी दाखल झाले. मोटारबोटीच्या सहाय्याने त्यांनी या वेडसर इसमाला छतावरून सुखरूप बाहेर काढले. चार तासानंतर हे थरारनाटय़ संपले.

धरणातील जलसाठा वाढला

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य धरणातील जलसाठा वाढला आहे. सध्या तोतलाडोह धरणात ५९ टक्के तर नवेगांव खैरी धरणात ६४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  ६ जुल रोजी जिल्’ात असलेल्या धरणाचा जलसाठा चिंताजनक पातळीवर गेला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ११.१४ टक्क्यांनी जलसाठय़ात तूट होती. यामुळे पुढे जलसंकट येण्याची शक्यता वर्तवली जात होती.  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात सध्या ६०३.९९२ दलघमी उपयुक्त जलसाठा असून धरण ५९.३८७ टक्के भरले आहे. तर गतवर्षी याच दिवशी धरणात ८३३.२१५ दलघमी जलसाठा होता व ८१.९३४ टक्के धरण भरले होते. नवेगांव खैरी धरणात सध्या ९२.००४ दलघमी उपयुक्त जलसाठा असून ६४.७९२ टक्के धरण भरले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी धरणात १०७.२८९ दलघमी जलसाठा होता व धरण ७५.५५६ टक्के भरले होते. जिल्’ात पाच मोठे धरण असून यामध्ये ८२३.७२६ दलघमी जलसाठा आहे. तो गतवर्षी १०६७.५४३ एवढा होता. तर मध्यम धरणे १२ आहेत. त्यात सध्या ७९.२४४३ दलघमी जलसाठा असून गतवर्षी याच दिवशी तो ८४.३४७९ दलघमी होता.तसेच जिल्’ात ६० लघु धरणे आहेत. सध्या त्यात ९६९.३५२२ दलघमी जलसाठा असून गेल्यावर्षी तो १२०९.८११६ दलघमी इतका होता.नागपुरात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प असून यामध्ये आजचा उपयुक्त जलसाठा १५००.२६ दलघमी असून ३२.५६ टक्के धरणे भरलेली आहेत. यामुळे पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने दोन दिवसांच्या संततधारेमुळे शहरावासीयांना पाऊस दिलासा मिळाला आहे.मेयो ,

सुपरमध्ये गळती!

उपराजधानीत पावसामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) टीबी वार्डात काही ठिकाणी छताला गळती लागली आहे. तर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात पाणी गळत असल्याने रुग्णांना प्रचंड मन:स्ताप होत आहे. तर मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३५ मध्येही पाणी गळत असले तरी सुदैवाने हे वार्ड रिकामे असल्याने कुणाला त्रास झाला नाही. पावसामुळे मोठ-मोठे वृक्ष व जुन्या इमारतीत असलेल्या मेयोतील टीबी वार्ड क्रमांक  १० व १२ येथे छताला गळती लागली. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, मेयो प्रशासनाकडून शुक्रवारी छत स्वच्छ करणार असल्याचा दावा करत आहेत. तर सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागालागी गळती लागली आहे.  दुपारी पाऊस सुरू झाल्यावर काहींना मन:स्ताप सहन करावा लागला.