१० लाख ७१ हजार नागरिकांनी लस घेतली

नागपूर :  नागपूर जिल्हा प्रशासनाने करोना लसीकरण अभियानात  चांगली भरारी घेतली आहे. नागपुरात आतापर्यंत १० लाख ७१ हजार ६३१ नागरिकांनी लस घेतली असून लसीकरणात राज्यात  पुणे आणि मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक आहे.

२०११ च्या लोकसंख्येनुसार शहर आणि जिल्’ाची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. करोना लसीकरणासाठी अ‍ॅपवर नोंदणी केली जात असून जेवढय़ा नागरिकांनी नोंदणी केली आहे तेवढय़ा नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागपुरात १६ जानेवारी २०२१ ला लसीकरण सुरू झाले. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणारे व्यक्ती, त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वच नागरिक टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. करोना अ‍ॅपवरील नोंदणीनुसार नागपूर जिल्’ात आतापर्यंत १०,७१,६३१ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यासाठी १३,६५,४४८ लसीची मात्रा देण्यात आली आहे. ही टक्केवारी २९.३४  इतकी आहे.

पुणे जिल्’ाची लसीकरणाची लोकसंख्येच्या (२०११ चे लोकसंख्येचे आधारे) तुलनेत टक्केवारी ३६.६२ इतकी असून लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा क्रमांक एकवर आहे. मुंबईमध्ये ३४.५६ टक्के लोकांनी लस घेतली आहे. विदर्भातीलच अमरावती जिल्’ात १९.०२ टक्के लसीकरण झाले असून त्याखालोखाल नाशिक जिल्हा १८.२६, ठाणे जिल्हा १८.०९ आणि औरंगाबाद जिल्हा १७.७५ अशी लसीकरणाची टक्केवारी आहे.

शहरात मंगळवापर्यंत ५ लक्ष ३४ हजार ४५३ नागरिकांनी पहिली मात्रा आणि १ लाख ८२ हजार १९७ लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. दोन्ही  लसीची मात्रा मिळून ७ लाख १६ हजार ६५० नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.  सध्या राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंदच आहे. मात्र, या वयोगटातील ज्या व्यक्तींनी कोव्हॅक्सिनची पहिली

मात्रा घेतली होती, त्यांच्यासाठी दुसऱ्या मात्रेची  व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑनलाईन नोंदणी करून त्यांना कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेता येईल. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी तात्काळ पहिली मात्रा घ्यावी. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होणार असून तेव्हा होणारी गर्दी टाळण्यास ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.