News Flash

Coronavirus : जिल्ह्य़ातील करोनामुक्तांची संख्या ४ लाख पार

२४ तासांत ६७ मृत्यू; नवीन २,५३२ रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

२४ तासांत ६७ मृत्यू; नवीन २,५३२ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ हजार ५३२ नवीन रुग्णांची भर पडली. दिवसभरात जिल्ह्य़ात त्याहून दुप्पट म्हणजे ५ हजार ७०८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ४ लाखांवर गेली आहे.

करोनामुक्तांमध्ये शहरातील २ हजार ६४१, ग्रामीणचे ३ हजार ६७ अशा एकूण ५ हजार ७०८ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ९५ हजार ९०, ग्रामीण १ लाख ९ हजार ६१२ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ४ हजार ७०२ व्यक्तींवर पोहोचली आहे. कोरनामुक्तांचे प्रमाण ८८.६८ टक्के आहे. दरम्यान, दिवसभरात शहरात ३५, ग्रामीण १९, जिल्ह्य़ाबाहेरील १३ अशा एकूण ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार १९, ग्रामीण २ हजार १०४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २०२ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ३२५ रुग्णांवर पोहोचली आहे. २४ तासांत शहरात १ हजार ३१९, ग्रामीण १ हजार २००, जिल्ह्य़ाबाहेरील १३ असे एकूण जिल्ह्य़ात २ हजार ५३२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २१ हजार ९६२, ग्रामीण १ लाख ३३ हजार ३४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३८४ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ५६ हजार ३८० रुग्णांवर पोहोचली आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या ३७ हजारांखाली

जिल्ह्य़ात एकेकाळी ५० हजारांवर करोनाग्रस्त रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू होता. परंतु आता ही संख्या कमी होताना दिसत आहे. बुधवारी शहरात २२ हजार ११०, ग्रामीण २१ हजार २४३ असे एकूण जिल्ह्य़ात ४३ हजार ३५३  उपचाराधीन  रुग्ण होते. त्यातील गंभीर संवर्गातील ६ हजार ७५५ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ३६ हजार ५९८ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

१७.५० टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभऱ्यात १२ हजार ४१०, ग्रामीणला ४ हजार ७५१ असे एकूण जिल्ह्य़ात १७ हजार १६१  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल गुरुवारी अपेक्षित आहेत. परंतु मंगळवारच्या १४ हजार ४६४ नमुन्यांत २ हजार ५३२ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण १७.५० टक्के नोंदवले गेले.

आज ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना उद्या गुरुवारी लसीची दुसरी मात्रा दिली जाईल. महापालिकेच्या  सर्व ९६ केंद्रांवर लसीकरण केले जाईल. मेडिकल, डॉ. आंबेडकर रुग्णालय इंदोरा व स्व. प्रभाकर दटके म.न.पा. महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा उपलब्ध असून अन्य केंद्रावर कोविशिल्डची दुसरी मात्रा दिली जाईल. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, राज्य शासनाच्या पुढील आदेशानंतर  या वयोगटातील लोकांना लस दिली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

विदर्भातील करोना बळींची संख्या पुन्हा दोनशे पार

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा करोना मृत्यूची संख्या वाढून दोनशे पार गेल्याने चिंता वाढली आहे. येथे दिवसभरात २२१ रुग्णांचा मृत्यू तर ९ हजार ७५८ नवीन रुग्णांची भर पडली. विदर्भात १० मे रोजी १९२ रुग्णांचा मृत्यू तर ७ हजार ५३० नवीन रुग्णांची भर पडली होती. त्यापूर्वीही ही संख्या कमी-कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र होते. परंतु बुधवारी विदर्भात अचानक मृत्यूसह नवीन रुग्णसंख्याही वाढल्याने चिंता वाढली आहे. २४ तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये नागपुरातील ३५, ग्रामीण १९, जिल्ह्य़ाबाहेरील १३, अशा एकूण ६७ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत २ हजार ५३२ नवीन रुग्ण नोंदवले गेले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३०.३१ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. भंडाऱ्यात ११ रुग्णांचा मृत्यू तर ३०९ रुग्ण, अमरावतीत २० मृत्यू तर १ हजार ९२ रुग्ण, चंद्रपूरला ३९ मृत्यू तर १ हजार ४९ रुग्ण, गडचिरोलीत ७ मृत्यू तर ३८५ रुग्ण, गोंदियात ५ मृत्यू तर ६२६ रुग्ण, यवतमाळला २७ मृत्यू तर ७१० रुग्ण, वाशीमला ७ मृत्यू तर ४२८ रुग्ण, अकोल्यात १० मृत्यू तर ८६७ रुग्ण, बुलढाण्यात ५ मृत्यू तर १ हजार १४३ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २३ मृत्यू तर ६१७ नवीन रुग्ण आढळले.

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

*   शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी :  ०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२

*   औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  : ०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

*   रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:12 am

Web Title: nagpur report 2532 fresh covid cases in last 24 hours zws 70
Next Stories
1 भंडाऱ्यात आढळले वाघाच्या बछड्यांचे मृतदेह; जवळच वाघिणीच्या पावलांच्या खुणा असल्याने शोध सुरु
2 करोनायोद्धेच लसप्रतीक्षेत!
3 १६ रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्पासाठी प्रयत्न
Just Now!
X