News Flash

जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव ओसरतोय..

ग्रामीणमध्ये सकारात्मक अहवालाचे प्रमाण २७ टक्के

२४ तासांत ७३ मृत्यू; नवीन ३,१०४ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर ३ हजार १०४ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या काही दिवसांपासून सतत मृत्यूसंख्या कमी होण्यासह नवीन रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

गेल्या २४ तासांमध्ये आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील १ हजार ६१४, ग्रामीण १ हजार ४७९, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा एकूण ३ हजार १०४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख १७ हजार ९०९, जिल्ह्य़ाबाहेरील १ लाख २९ हजार ८१९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३४७ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ४९ हजार ७५ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात अनेक आठवडय़ानंतर  नवीन  रुग्णांची संख्या दोन हजाराखाली नोंदवली गेली आहे.  शहरात दिवसभरात ४७, ग्रामीण १५, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा  एकूण  ७३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ९२१, ग्रामीण २ हजार ५६, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १६५ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार १४२ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात चाचण्यांची संख्या पुन्हा घसरल्याचे दिसत आहे.

शहरात २४ तासांत १२ हजार ७५७, ग्रामीणला ५ हजार ७८ अशा एकूण १७ हजार ८३५  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल सोमवारी अपेक्षित आहेत.  शनिवारी चाचणी झालेल्या २० हजार २३५ नमुन्यांत ३ हजार १०४ रुग्णांना करोना असल्याचे पुढे आले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरून १५.३३ टक्के नोंदवले गेले.

 

करोनामुक्तांचे

प्रमाण ८६ टक्के

शहरात दिवसभरत ४ हजार ३६२, ग्रामीणला २ हजार १८२ असे एकूण  ६ हजार ५४४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ८४ हजार ८१२, ग्रामीण १ लाख १ हजार ३८९ अशी एकूण जिल्ह्य़ात ३ लाख ८६ हजार २०१ व्यक्तींवर पोहचली. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण ८६ टक्के नोंदवले गेले.

 

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

’  शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी : ०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२  ’  औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  : ०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

’  रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२

 

ग्रामीणमध्ये सकारात्मक अहवालाचे प्रमाण २७ टक्के

शहरात रविवारी १,६१४, ग्रामीणला १,४७९ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण शहरात घसरून केवळ १०.९३ टक्के नोंदवण्यात आले असले तरी ग्रामीण भागात मात्र २६.९९ टक्के नोंदवले गेले. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचे संक्रमण अधिक असल्याचे दिसत आहे.

४५ वरील नागरिकांचे आज लसीकरण नाही

लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे उद्या सोमवारी  लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी सोमवारी  ६ केंद्र सुरू राहतील. यामध्ये कोव्हॅक्सिनचे लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सवरेदय मंडळ हॉल छाप्रूनगर,  राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, मनीषनगर, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल.  शहरातील विविध भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, मात्र राज्य शासनाकडून लसीचा साठा मिळत नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.  नगरसेवक आपापल्या प्रभागात लसीकरणाबाबत जनजागृती करत असले तरी केंद्रावर लसच उपलब्ध नसल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले असून त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

विदर्भात अकरा हजाराहून कमी नवीन करोनाग्रस्त

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या २४ तासांत येथे २३० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर १० हजार ७२७ नवीन रुग्णांची भर नोंदवली गेली. रुग्णसंख्या सातत्याने घसरत असल्याने सर्वसामान्यांना आंशिक दिलासा मिळाला आहे. विदर्भात २७ एप्रिलला २५३ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर १५ हजार ५२ रुग्ण आढळले होते. २८ एप्रिलला ही संख्या २८५ मृत्यू तर १५ हजार ३८९ रुग्ण, २९ एप्रिलला २८२ मृत्यू तर १५ हजार ९३८ नोंदवली गेली होती. ही संख्या वाढत असल्याने चिंता वाढली असतानाच आता रुग्णसंख्या पुन्हा कमी होताना दिसत आहे. येथे ६ मे रोजी २०६ मृत्यू तर १२ हजार ७५१ रुग्ण, ८ मे रोजी २४१ मृत्यू तर ११ हजार १३६ रुग्ण आढळले. तर रविवारी दिवसभरात नागपूर शहरात ४७, ग्रामीण १५, जिल्ह्य़ाबाहेरील ११, अशा एकूण  ७३ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३१.७३ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ३ हजार १०४ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात ९ रुग्णांचा मृत्यू तर ४११ रुग्ण, अमरावतीत २३ मृत्यू तर १ हजार १८६ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २२ मृत्यू तर १ हजार १८० रुग्ण, गडचिरोलीत १४ मृत्यू तर ४२७ रुग्ण, गोंदियात ७ मृत्यू तर ६२५ रुग्ण, यवतमाळला ३६ मृत्यू तर १ हजार ३२ रुग्ण, वाशीमला २ मृत्यू तर ४६९ रुग्ण, अकोल्यात १२ मृत्यू तर ७६२ रुग्ण, बुलढाण्यात ५ मृत्यू तर ७७३ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २७ मृत्यू तर ७५८ नवीन रुग्ण आढळले.

सक्रिय रुग्णांची संख्या ५४ हजांराहून खाली

शहरात २८ हजार ४३३, ग्रामीणला २६ हजार २९९ असे एकूण  ५४ हजार ७३२  सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील ४७ हजार २०१ रुग्णांवर गृहविलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ७ हजार ५३१ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 5:01 am

Web Title: nagpur reports 3104 new covid 19 cases zws 70
Next Stories
1 रेमडेसिविरच्या काळाबाजारप्रकरणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारीही!
2 राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा
3 विश्वस्त नेमताना पात्रता तपासणी महत्त्वाची
Just Now!
X