परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर जप्त करण्यात आलेले परीक्षेचे प्रवेश पत्र परत करण्यासाठी धरमपेठ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला मध्यरात्री भ्रमणध्वनी करून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारानंतर मुलीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व पंजू तोतवानी हे आपल्या आठ ते दहा कार्यकर्त्यांसह महाविद्यालयात घुसून प्राध्यापकाला काळे फासले व मारहाण करून पोलीस ठाण्यात नेले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

अमित गणवीर असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. पीडित मुलगी ही उत्तर अंबाझरी मार्गावरील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षांला शिकत आहे. १३ एप्रिलपासून तंत्रनिकेतनच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षेला प्रारंभ झाला. तिला अंबाझरी परिसरातील धरमपेठ विज्ञान महाविद्यालय परिसरातील धमरपेठ तंत्रनिकेतन हे केंद्र मिळाले. पहिल्याच पेपरवेळी परीक्ष केंद्रात मुलीजवळ मोबाईल सापडला होता. त्यावेळी परीक्षा केंद्र डय़ुटीवर असणारे गणवीर याने तिचा मोबाईल ताब्यात घेतला व कॉपी करण्याच्या कारवाईसाठी तिचे प्रवेश पत्र जप्त केले. दंड करण्याच्या उद्देशाने तिला तीन तास कार्यालयात बसवून ठेवले आणि त्यानंतर तिला सोडण्यात आले. यादरम्यान गणवीरने मोबाईल क्रमांक मिळविला व प्रवेशपत्रही स्वत:च्याच ताब्यात ठेवले. त्याच रात्री त्याने तिला भ्रमणध्वनी करून प्रवेशपत्र परत हवे असल्यास एक रात्र सोबत घालविण्याची मागणी केली. दोघांमधील संभाषण मुलीने रेकॉर्ड करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सर्व प्रकार एका मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने पीडित मुलीची भेट पंजू तोतवानी यांच्याशी घालून दिली. त्यानंतर आज बुधवारी दुपारच्या सुमारास तोतवानी आपल्या आठ ते दहा कार्यकर्त्यांसह धरमपेठ तंत्रनिकेतन मविद्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी प्राचार्य महेश बक्षी यांची त्यांच्यात कार्यालयात भेट घेतली आणि सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी प्राचार्यानी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, प्राचार्यानी अमितला बोलवून घेतले होते. अमित प्राचार्याच्या कार्यालयात पोहोचताच पंजू तोतवानी व इतरांनी अमितला मारहाण करण्यात सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावर काळे फासले. त्यानंतर तशाच अवस्थेत प्राध्यापकाला अंबाझरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मुलीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. मात्र, तोतवानी आणि इतरांविरुद्ध महाविद्यालयाकडून अद्याप तक्रार प्राप्त झाली नसून प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल,अशी माहिती अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीश यांनी दिली.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

घटना पूर्वनियोजित
तोतवानी यांचा पूर्वनियोजित कट होता. आमच्या मालकीच्या जागेत घुसखोरी केली. कॅमेरेमन, शाईची बाटली आणली होती. ते कोण हे आम्हाला माहिती नव्हते. मात्र, मी पंजू तोतवानी असल्याचे ते कॅमेऱ्यासमोर बोलत असताना आम्हाला त्यांचे नाव कळले. तसेच बाकी कर्मचाऱ्यांनाही त्यांनी धमकावले. संबंधित मुलगी आमच्या तंत्रनिकेतनची नाही. तिचे परीक्षा केंद्र आमच्या तंत्रनिकेतनमध्ये आहे.
– महेश बक्षी, प्राचार्य, धरमपेठ तंत्रनिकेतन