10 April 2020

News Flash

डॉ. नीरज खटींना ‘क्लिन चिट’

डॉ. खटी यांना निवडणूक अधिकारी व जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘क्लिन चिट’ दिली आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपचा दुपट्टा घालून सहभाग

नागपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचार यात्रेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी सहभागी झाल्याची तक्रार

निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. खटी यांना निवडणूक अधिकारी व जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘क्लिन चिट’ दिली आहे. फडणवीस हे दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्रनगर भागातातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महापौर संदीप जोशी, प्रकाश भोयर यांच्यासह डॉ. नीरज खटी दिसून आले. रॅलीमध्ये डॉ. खटी हेसुद्धा भाजपचा दुपट्टा घालून दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांना निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होता येत नाही. असे झाल्यास तो आचारसंहितचे भंग ठरतो. असे असतानाही डॉ. नीरज खटींसारखे विद्यापीठाचे महत्त्वाचे अधिकारी चक्क माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार यात्रेत दिसून आल्याने याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, डॉ. खटी यांच्याकडून आचारसंहितेचा भंग न झाल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांना ‘क्लिन चिट’ दिली आहे.

सेवाशर्तीचा भंग करूनही कारवाई नाही

डॉ. खटी यांनी निवडणूक प्रचार यात्रेमध्ये सहभागी होत विद्यापीठाच्या सेवाशर्तीचा भंग केला होता. डॉ. खटी हे विद्यापीठाचे कर्मचारी असल्याने त्यांची अंतर्गत चौकशी करून विद्यापीठाच्या सेवाशर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, कुलगुरू डॉ. काणे यांनी खटींवर मेहरनजर ठेवत हे प्रकरण निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवून खटींचा बचाव केल्याचे आता बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 12:32 am

Web Title: nagpur vidhan sabha election bjp rashtrasant nagpur university registrar in charge of the university dr neeraj khati akp 94
Next Stories
1 तरुणींच्या नकाराचे स्वातंत्र्य तरुणांनी स्वीकारायला हवे!
2 हवामानबदलामुळे गोड पानाचा विडा महागला..
3 वातावरण बदलाचा नागपुरी संत्र्याला फटका
Just Now!
X