27 February 2021

News Flash

नागपूरात २४ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या

गुढी पाडव्याच्या दिवशीच नागपूरमध्ये एका २४ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्याचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. राळेगाव तालुक्यातील वडगावातील २४ वर्षीय श्रीजीत विलासराव हाते या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाडव्याच्या दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली असल्याचा आंदाज स्थानिक लोकांनी बांधला आहे. मात्र, श्रीजीतच्या आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.

श्रीजीत आणि त्याचा मोठा भाऊ संयुक्तरित्या शेती करत होते. दोन्ही भावंडाच्या नावे प्रत्येकी चार एकर शेती आहे. गेल्या काही वर्षापासून शेतीतून उत्पन्न नव्हते. यातूनच श्रीजीतने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असू शकतो. असे परिसरात म्हटले जात आहे.

याआधी ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वडिलांनी विहिरीमध्ये पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 2:13 pm

Web Title: nagpurs 24 year young farmer suicide on eve of gudhi padwa
Next Stories
1 राजकीय पक्षांनी मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर केला
2 लोकजागर : सुसंस्कृतांची वाचाळगिरी!
3 वेकोलिच्या उत्पादनात  नव्या विक्रमाची नोंद
Just Now!
X