25 February 2021

News Flash

‘न्यायमूर्ती बृजमोहन लोया रविभवनात थांबलेच नव्हते’

मृत्यूप्रकरणाची फेरचौकशी करा-नाना पटोले

नाना पटोले

मृत्यूप्रकरणाची फेरचौकशी करा-नाना पटोले

न्या. बृजमोहन लोया यांचा २०१४ मध्ये नागपुरात मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू संशायस्पद असून या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी नुकतेच काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. तपासात न्या. लोया हे रविभवनात थांबले असल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात ते रविभवनात थांबलेच नव्हते, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

बजाजनगरातील प्रशांत पवार यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच  प्रश्न उपस्थित केले, ही घटना लोकशाहीसाठी वेदनादायक आहे. न्यायधीशांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने न्यायव्यवस्थेत सरकारच्या विरोधात  असलेले बंड समोर आले. केंद्र शासन संवैधानिक व्यवस्थेचे धिंडवडे काढत आहे. आताचे बंड हा त्याचाच परिपाक असल्याचे पटोले यांनी करून केंद्र सरकारवर तोफ डागली. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाच्या सुनावणीत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अनावश्यक सहभाग दाखविल्याबद्दलही उपरोक्त न्यायमूर्तींनी आक्षेप घेतला होता. न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची गरज आहे. न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या तापसणीत ते नागपुरातील सार्वजानिक बांधकाम विभागाच्या रविभवन विश्रामगृहात थांबले असल्याचा उल्लेख आहे. मात्र,  प्रत्यक्षात रविभवनातील नोंदवहीची तपासणी केली असताना त्यात त्यांच्या नावाची नोंद नाही. त्यामुळे ते तिथे थांबलेच नाही, असा दावा पटोले यांनी केला. न्या. लोया यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा आरोप लोया यांच्या कुटुंबीयांनी केला होता. शिवाय जनहित याचिका दाखल झाली आहे,

‘भाजपकडूनच न्यायव्यवस्थेचे धिंडवडे’

काँग्रेस न्यायवस्थेत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला जात असताना तो चुकीचा आहे. उलट केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये. भाजपने न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत तर काँग्रेस न्याय व्यवस्था जोपासण्याचे काम करीत असल्याचे पटोले म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 3:54 am

Web Title: nana patole demand investigation in special cbi judge bh loya death
Next Stories
1 स्मार्ट सिटी कार्यालयासाठी दोन कोटींची उधळपट्टी
2 शहरात खासगी बस प्रवेश बंदी लांबली
3 शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी तुटपुंज्या सोयीसुविधा
Just Now!
X