02 July 2020

News Flash

गांधी हत्येसाठी नथुरामला सावरकरांकडून प्रेरणा!

संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप

संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप
राष्ट्रपिता म. गांधींवर गोळ्या जरी नथुराम गोडसे याने झाडल्या तरी त्याला याची प्रेरणा सावरकर यांच्याकडून मिळाली व त्याला पाठबळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेने दिले होते, असा आरोप गांधीजींचे पणतू ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक तुषार गांधी यांनी केला. त्यांनी यासाठी अनेक दाखलेही दिले.
युवा जागर आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी ‘गांधी हत्येमागील षडयंत्राचे सत्य’ या विषयावर महाविद्यालयाच्या प्रांगणात तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गांधीजींच्या हत्येचे समर्थन करताना नथुराम गोडसे समर्थक व हिंदूत्ववादी संघटनांकडून उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याला स्पर्श करताना ते कसे खोटे आहेत, हे त्यांनी मुद्देसूदपणे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 2:59 am

Web Title: nathuram godse inspire from savarkar for mahatma gandhi murder
टॅग Mahatma Gandhi
Next Stories
1 महसूल खात्यात आता अधिकाराचे विकेंद्रीकरण
2 विदर्भात रामदेव बाबा १५ हजार कोटी गुंतवणार
3 नागपूर महोत्सवाचे विभाजन!
Just Now!
X