आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या खूनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या नागपुरातील धरपेठ येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची झिंगाबाई टाकळी येथील खुल्या कारगृहात करण्यात आली.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या एकनाथ निमगडे यांची ६ सप्टेंबर २०१६ ला भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलीहोती. कोट्यवधी रुपयांच्या जमीन वादातून काही अज्ञातांनी सुपारी घेऊन हत्या केल्याचा दावा अलीकडेच नागपूर पोलिसांनी केला होता. ही जमीन फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आहे. या हत्येमध्ये फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल, असा दावा वेदप्रकाश आर्य यांनी केला आहे.