09 April 2020

News Flash

मदत हवी आहे,पोलिसांशी संपर्क करा!

पोलीस उपायुक्तांचे लोकांना आवाहन 

बारावीमध्ये नापास झाल्यानंतरही न खचता मनोज कुमार यांनी संघर्षावर मात करत महाराष्ट्र कॅडरमध्ये आयपीएस झाले. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मनोज कुमार यांच्या संघर्षाची स्टोरी पाहणार आहोत.

संचारबंदीच्या काळात नागपूरकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण,  घाबरण्याची गरज नाही. ज्यांना मदत लागली  त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क करून मदत मागावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी काही भ्रमणध्वनी संपर्क जाहीर केले आहेत.

संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सुविधांसाठी लोकांना बाहेर पडता येते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवेकरिता दुचाकी व कारचा वापर करायचा असल्यास आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यातून  पास घेणे बंधनकारक आहे. अनेक वृद्धांना घराबाहेर पडता येत नसल्याने बजाजनगर पोलीस एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने लक्ष्मीनगर परिसरातील लोकांना घरपोच सेवा देत आहेत. त्याव्यतिरिक्त शहरातील इतर भागातील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या ९८२३२३३००१०० आणि वाहतूक पोलिसांच्या ९०११३८७१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याशिवाय काही गरज वाटल्यास लोकांनी न घाबरता केव्हाही पोलीस ठाण्याच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक मासळ यांनी केले आहे.

चार हजारांवर पोलीस बंदोबस्तात

शहरात संचारबंदी लागू असून  प्रत्येक चौकात व गल्लीबोळात पोलीस दिसत आहेत. उपराजधानीत संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे म्हणून ४ हजारांवर पोलीस कर्मचारी व अधिकारी रस्त्यांवर तैनात आहेत. यात ८ पोलीस उपायुक्त, १२ सहाय्यक आयुक्त, ७२ पोलीस निरीक्षक, २३७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, २ हजार ४६५ पुरुष पोलीस, ३४१ महिला पोलीस आणि १०० गृहरक्षकांचा समावेश आहे. त्याशिवाय शहराच्या सीमेवर ८ नाक्यांवर ४० अधिकारी व १७६ कर्मचारी तैनात आहेत. पोलीस ठाण्यांतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी, फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग सुरू आहे. गुन्हे शाखेचे २ पथक, आर्थिक गुन्हे शाखेचा १ पथक, पोलीस मुख्यालयातील ६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय ६ दंगल विरोधी पथक आणि २ शीघ्र कृती दल तैनात आहेत. तसेच जवळपास ८०० वाहतूक कर्मचारी व अधिकारी तैनात आहेत, अशी माहिती विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली असून लोकांनी घराबाहेर पडणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

वकिलांकडून आर्थिक मदतीचा हात

करोनाशी लढा देण्याकरिता उपराजधानीतील वकिलांकडून पंतप्रधान सहाय्यक निधीकरिता निधी गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कमल सतुजा यांनी याकरिता पुढाकार घेतला असून आतापर्यंत त्यात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. अंजली भांडारकर यांनी ३१ हजार, अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी २१ हजार, अ‍ॅड. आकाश गुप्ता २१ हजार, अ‍ॅड. गिरीश कुंटे १६ हजार, अ‍ॅड. नीतेश समुंद्रे ११ हजार, अ‍ॅड. ज्योती वजानी ५ हजार आणि अ‍ॅड. समीर सोनवणे यांनी ५ हजारांची मदत दिली. वकिलांकडून मदतीचा ओघ सुरूच राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:22 am

Web Title: need help contact police abn 97
Next Stories
1 नागपुरातील १२ औषध दुकाने २४ तास सेवा देणार
2 औषध दुकानांमध्ये ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ गोळ्यांचा तुटवडा
3 ‘एम्स’मध्ये १०० खाटा!
Just Now!
X