‘थ्री-बॅन्डेड रोजफिं च’ या दक्षिण चीनमधील स्थानिक आणि भूतानपर्यंत स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीची नोंद भारतात करण्यात आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील जंगलातून याची नोंद केली आहे. या पक्ष्याची भारतातील ही पाहिलीच नोंद आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहाय्यक संचालक डॉ. गिरीश जठार आणि त्यांचे सहकारी पूर्व हिमालयात ‘फिं च’ या पक्ष्याचे सर्वेक्षण करत आहे. यादरम्यान संशोधक अथर्व सिंह आणि हिमाद्री शेखर मोंडल यांना अरुणालच प्रदेशात ‘थ्री-बॅन्डेड रोजफिं च’हा पक्षी दिसला. यावेळी त्यांना या पक्ष्याच्या नर आणि मादी दोन्हीचे छायाचित्र टिपण्यात यश आले. या परिसरात ‘व्हाईट-ब्राऊड रोजफिं ज’हा पक्षी आढळून येतो. या पक्ष्यांसोबतच त्यांना ‘थ्री-बॅन्डेड रोजफिं च’ या पक्ष्याची जोडी आढळली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी या पक्ष्याची के लेली नोंद ‘इंडियन बर्डस’ या शोधपत्रिके तही प्रसिद्ध झाली आहे. भारतातून आतापर्यंत सुमारे एक हजार ३४० प्रजातींची नोंद झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हौशी पक्षीनिरीक्षकांकडून दुर्गम भागात पक्षीनिरीक्षणाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे भारतात अनेक पक्ष्यांची नव्याने नोंद झाली आहे. २०१६ पासून भारतातील पक्ष्यांच्या यादीत सुमारे १०४ प्रजातींची नोंद घेण्यात आली आहे. २०२० मध्ये तीन प्रजाती आणि २०२१ मध्ये पाच प्रजातींची नोंद घेण्यात आली आहे.

चायनातून भूतानकडे स्थलांतर करताना ‘थ्री-बॅन्डेड रोजफिं च’ हा पक्षी अरुणाचल प्रदेशातील या जंगलाचा भ्रमणमार्ग म्हणून वापर करत असावा. हा परिसर या प्रजातीच्या स्थलांतरणाचा मार्ग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– अथर्व सिंह

चीनमध्ये चांगल्या दर्जाच्या निवास भागात या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे. मात्र, भारतात ज्या ठिकाणी ही प्रजाती आढळली, तो अधिवास चीनपेक्षाही अधिक अतिउच्च दर्जाचा आहे. भारतातील अधिवास या पक्ष्यासाठी अधिक चांगला आहे.

– डॉ. गिरीश जठार