नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील (RSS Headquarter) ९ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. संघाच्या एका ज्येष्ठ स्वंयसेवकानी शनिवारी ही माहिती दिली. ‘संघाच्या मुख्यालयात राहणारे ९ जण दोन ते तीन दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बहुतांश जण ज्येष्ठ कर्मचारी आहेत. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय संपूर्ण मुख्यालय सॅनिटाइज करण्यात आलं आहे, असे त्यांनी सांगितलं.’

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी येथेच राहातात. मात्र, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली तेव्हा ते मुख्यालयात उपस्थित नव्हते. संघाच्या मुख्यालयात जवळपास २० स्वंयसेवक राहतात, असेही ते म्हणाले.

हिन्दुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, ९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती ज्येष्ठ स्वंयसेवकाने सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आली आहे. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय मुख्यालय सॅनिटाइज करण्यात आलं आहे.

दरम्यान, नागपूर शहारामधील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून महापौर संदीप जोशी यांनी ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि पत्नी यांना करोनाची लागण झाली आहे.