नितीन गडकरी यांचा इशारा

बेधडक विधाने करून खळबळ उडवून देणाऱ्या नितीन गडकरी यांनी आता नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ‘पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बिनधास्त तक्रारी करा. त्यांना ठोकून काढू. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छातीवर बसून त्यांना रगडल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान

नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शहरात विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. सुभाषनगर आणि शास्त्रीनगरात आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी थेट महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शाब्दिक असूड ओढले. ते म्हणाले की, ‘महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी लक्ष्मीभक्त झाले आहेत. लक्ष्मीदर्शनाशिवाय ते कामे करायला बघत नाहीत. त्यांच्या छातीवर बसून  त्यांना रगडल्याशिवाय राहणार नाही. पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी करा. त्यांना ठोकून काढू’. अंबाझरी तलावातून शेगाव आणि शिर्डीकरता सागरी विमान सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली.