|| महेश बोकडे

हाफकीनने वर्षभरानंतरचे नियोजन विचारले :- कर्करुग्णांवर उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसिन प्रकल्प तांत्रिक पेचात अडकला आहे. योजनेसाठी यंत्र खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकीनने मेडिकलला एक वर्षांनंतर यंत्र चालवण्यासाठी काय नियोजन आहे? असा प्रश्न विचारला आहे. आता मेडिकलने उत्तर दिल्यावरच हा प्रकल्प पुढे जाणार आहे.

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

न्युक्लिअर मेडिसिन ही कमी वेदना देणारी पद्धत आहे. कर्करोगसदृश आजाराचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला, हे ओळखण्यासह उपचारासाठी ती वापरली जाते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य भारतातील रुग्णांना असे अद्ययावत उपचार मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला. त्यानुसार हाफकीनला या प्रकल्पासाठी महागडे गामा कॅमेरा यंत्र खरेदीच्या सूचना केली गेली. त्यानुसार निविदा प्रक्रिया झाली. प्रक्रियेच्या नियमात सुमारे वर्षभर हे यंत्र चालवणाऱ्या तंत्रज्ञांसह इतर महत्वाच्या कर्मचाऱ्यांचा निविदेत समावेश केला गेला. परंतु त्यानंतर हे यंत्र चालणार कसे? असा प्रश्न उपस्थित झाला.

हाफकीनकडून प्रक्रिया थांबवून मेडिकल प्रशासनाला वर्षभरानंतर या यंत्रासह हा विभाग चालणार कसा? त्यासाठी काय नियोजन केले? हा प्रश्न उपस्थित करत उत्तर मागितले आहे. त्यामुळे मेडिकलच्या अधिकाऱ्यांना हेही कळत नाही काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  सुमारे वर्षभर हा विभाग चालवल्यावर ही माहिती पुढे आली असती व हा विभाग बंद पडला असता तर जवाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२५ कोटींचा प्रकल्प

या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. यासाठी औषधशास्त्र, कर्करोग विभाग, हृदयरोग विभाग, क्ष-किरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांना एकत्रित काम करावे लागणार आहे. प्रकल्पासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतला होता. परंतु विद्यमान अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नेमकी थेरपी काय?

न्युक्लिअर मेडिसीन या निदान व उपचार पद्धतीत कॅन्सर तसेच इतर आजार जडल्यास सूक्ष्म पेशींमध्ये किती प्रमाणात आजार पसरला, याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. यानंतर इंजेक्?शन वा तोंडावाटे विशिष्ट औषध दिली जाते. त्यातून शरीराच्या नेमक्या अवयवातील बाधित पेशींना उद्ध्वस्त केले जाते. हा उपचार करताना आजूबाजूच्या पेशीला इजा होत नाही, हे या पद्धतीची विशेषता असून कमी वेदना देणारी उपचारपद्धती आहे.