पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्य़ांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये याच कालावधीत डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. परंतु सर्व सहा जिल्ह्य़ांची तुलना केल्यास निम्म्याने रुग्ण यावर्षी घसरल्याचे आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीतून पुढे आले आहे. या वृत्ताला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात २०१८ यावर्षी डेंग्यूच्या १ हजार १९९ रुग्णांची नोंद होती. त्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये १ हजार ३१६ रुग्णांची नोंद झाली असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १ जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये सहा जिल्ह्य़ांत ९०२ रुग्ण आढळले असून त्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये ऑक्टोबपर्यंत ३८९ रुग्णांची नोंद झाली असून २ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे रुग्णांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे, तर मृत्यूही कमी झाले आहेत. परंतु गडचिरोलीत जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये २०१९ मध्ये ७३ रुग्ण आढळले असले तरी २०२० मध्ये या कालावधीत ही संख्या वाढून १०१ रुग्ण नोंदवले गेले. वर्धा जिल्ह्य़ातही २०१९ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबपर्यंत ४२ रुग्ण नोंदवले गेले होते, तर २०२० मध्ये याच कालावधीत ६८ रुग्ण नोंदवले गेले.

डेंग्यू रुग्णांची जिल्हानिहाय स्थिती

(१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर)

जिल्हा  २०१९   २०२०

भंडारा  ०९ ०८

गोंदिया  १३ ०४

चंद्रपूर  ३६७ १७४

गडचिरोली   ०८ १४

नागपूर (ग्रा.) ६० ३९

वर्धा ४२ ६८

नागपूर (श.) ४०३ ८२

एकूण   ९०२ ३८९

डेंग्यूबळींची स्थिती

(१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर)

जिल्हा  २०१९   २०२०

भंडारा  ०१ ००

गोंदिया  ०० ००

चंद्रपूर  ०० ००

गडचिरोली   ०० ००

नागपूर (ग्रा.) ०१ ०१

वर्धा ०१ ००

नागपूर (श.) ०० ०१

एकूण   ०३ ०२