23 October 2018

News Flash

आंदोलकांवर अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे

पोलीस ठाण्यांतर्गत रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शताब्दी चौकात बंदोबस्तासाठी तैनात सशस्त्र पोलीस

आंदोलकांनी केलेल्या हिंसक कारवाईविरुद्ध तसेच बेकायदशीरपणे एकत्र आल्यामुळे सीताबर्डी, जरीपटका, पाचपावली, अजनी, वाडी, कामठी पोलिसांनी आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सीताबर्डी पोलिसांनी दिनेश अंडरसहारे, तुषार कंदागवळी, सागर डबरासे, वर्षां श्यामकुळे, अमितेश सूर्यवंशी, विनीता खोब्रागडे, अमन कांबळे, राहुल कांबळे, प्रदीप आगलावे, हितेश उईके, सुभाष चौरे, हितेंद्र बन्सोड, प्रवीण कांबळे, रोशन भिमटे, अमोल वासनिक, रुद्र धाकडे, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, वाडी पोलिसांनी रोशन सोमकुंवर, निशांत लोणारे, राकेश रामटेके, सिद्धार्थ खोब्रागडे, रितेश सोमकुंवर, नवीन कामठी पोलिसांनी संघपाल वासनिक, आशीष बागडे, संकेत फुले, निखिल गजभिये यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्याशिवाय जरीपटका, पाचपावली व अजनी पोलीस ठाण्यांतर्गत रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

First Published on January 4, 2018 2:24 am

Web Title: offenses fire against protesters in police stations