07 April 2020

News Flash

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’

दोन्ही कार्यक्रमस्थळी पहिल्या रांगेतील काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी या बाजारातील जोखीमीच्या अधीन असतात. योजनेतील सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा)

 

मंगळवार आणि बुधवारी गुंतवणुकीच्या नियोजनाचे योग्य मार्ग जाणून घेण्याची संधी

नागपूर : सर्वोच्च टप्प्यानजीक असलेले भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक, स्थिरावलेली मालमत्ता क्षेत्रातील हालचाल, स्वस्त: होऊ पाहणारे गृह व इतर कर्जाचे व्याजदर, सण-समारंभाच्या तोंडावर मौल्यवान धातूंच्या दरात होणारी  उसळी, या पार्श्वभूमीवर, आपल्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न मध्यमवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना पडतो. याचे उत्तर व यासंदर्भातील योग्य मार्गदर्शनासाठी  ‘आयसीआयसीआय प्रुडेंन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा कार्यक्रम मंगळवारी २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात (सकाळी १० वाजता) व २६ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात (स. ११ वा.) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.

कुटुंबाचा नित्य जमाखर्च, जीवनात निश्चित केलेली मोठी आर्थिक उद्दिष्टे तसेच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बचत, करबचतीतून गुंतवणूक, निवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल, आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचा अधिक परतावा मिळवण्यासोबतच पैसे सुरक्षित कसे राहू शकतील याची विस्तृत माहिती या कार्यक्रमातून दिली जाणार आहे तसेच गुंतवणुकीविषयी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे मिळावी, यासाठी दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह मार्गदर्शन केले जाईल.  ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जाजू तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर प्रशांत चौबळ मार्गदर्शन करतील.

२५ फेब्रुवारीला स. १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला  नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तर २६ तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयातील कार्यक्रमास विभागीय आयुक्त संजीवकुमार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दोन्ही कार्यक्रमस्थळी पहिल्या रांगेतील काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विषय व तज्ज्ञ मार्गदर्शक

  •  ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’       – गौरव जाजू
  •  ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’   – प्रशांत चौबळ

कधी-कुठे?

  • जिल्हाधिकारी कार्यालय
  •   मंगळवार २५ फेब्रुवारी, स. १० वाजता

 

 बचत भवन, सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन्स, नागपूर

  •   विभागीय आयुक्त कार्यालय
  •    बुधवार २६ फेब्रुवारी, स. ११ वा.
  •   विभागीय आयुक्त कार्यालयातील, सभागृह, सिव्हिल लाईन्स नागपूर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:43 am

Web Title: office of the collector divisional commissioner budget loksatta arthsalla akp 94
Next Stories
1 सायबर सेलमधील अधिकाऱ्यांचा अघोषित आराम
2 शहरातील विकासात्मक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी संवादावर भर
3 विकास कामांवरील स्थगिती उठवा
Just Now!
X