18 January 2021

News Flash

राफेल घोटाळ्याविरुद्ध  काँग्रेस रस्त्यावर

काँग्रेसने राफेल युद्धविमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संविधान चौकात राफेल युद्धविमान खरेदी घोटाळ्याचा आरोप करीत काँग्रेसने धरणे दिली. यावेळी बोलताना विकास ठाकरे.

संविधान चौकात धरणे आंदोलन

काँग्रेसने राफेल युद्धविमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संविधान चौकात बुधवारी धरणे आंदोलन करुन सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर आणि ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुत्तेमवार यांनी मोदी यांना लक्ष्य केले. संसेदत पहिल्यांदा प्रवेश करताना मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर डोके टेकवले होते. मात्र, संसदेत बोलताना आणि वागताना सांसदीय परंपरेचे पालन करत नाहीत. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करावे, त्याप्रमाणे मोदी भाषण करतात. अशा जनविरोधी सरकार विरोधात आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करावे लागणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी, असे आवाहन मुत्तेमवार यांनी  केले.

शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचीही भाषणे या वेळी झाली. मुकुल वासनिक यांच्या भाषणाने आंदोलनाचा समारोप झाला. तत्पूर्वी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी मंडपातून रस्त्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कडठे लावून त्यांना रोखून धरले. सरकारविरोधात  जोरादर घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिलाआघाडीच्या जिल्हाध्यक्ष तक्षशीला वागधरे, कुंदा राऊत तसेच इतरही महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

घोटाळा कसा

राफेल हे युद्धविमान असून द सॉल्ट या फ्रान्स कंपनीकडून भारत खरेदी करणार आहे. यूपीए सरकारने १२६ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव २००७ मध्ये सादर केला होता, परंतु तो व्यवहार प्रत्यक्षात आला नव्हता.

पंतप्रधान मोदी हे सप्टेंबर २०१६ गेले आणि विमान खरेदी केला, परंतु या करारात विमानांची संख्या ३६ झाली. शिवाय आधी एका विमानाची किंमत ६८० कोटी रुपये होती. नवीन करारानुसार एका विमानाची किंमत १६०० कोटी रुपये झाली, असा आरोप काँग्रेसचा आहे.

नागपूर कनेक्शन

राफेल युद्ध विमान खरेदी करताना झालेल्या करारानुसार द सॉल्ट एव्हीएशन कंपनीने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची प्रवासी विमान आणि इतर साहित्य बनवण्यासाठी निवड केली. या कंपनीला विमान बनवण्याचा अनुभव नाही. द सॉल्टशी करार झाला, तेव्हा या रिलायन्स डिफेन्स कंपनीच्या स्थापनेला १५ दिवस देखील झाले नव्हते. या कंपनीने मिहानमध्ये १०४ एकर जमीन घेतली आहे. येथे फॉल्फन या प्रवासी विमानांचे सुटे भाग सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यूपीएस सरकारने २००७ मध्ये प्रस्तावित केलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमत आहेत. यात कुठेही भ्रष्टाचार झाला नाही. संरक्षण मंत्री, संरक्षणविषयक तज्ज्ञांची याला संमती होती. काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नाही. कारगिल युद्धाच्यावेळी बोफोर्स तोफाची वरच्या टप्प्यात मारा करण्याची क्षमता नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर २००३ मध्ये  राफेल विमान खरेदी करण्याचा प्रस्ताव यूपीए सरकारने आणला, परंतु २००७ पर्यंत काहीच झाले नव्हते.

– गिरीश व्यास,  प्रवक्ते ‘भाजप’

द सॉल्ट एव्हीएशन कंपनी आणि रिलायन्स कंपनी विमानाची किंमत त्यांच्या अहवालात नमूद करते, परंतु मोदी सरकारला विमानांची किंमत सांगण्याचे धाडस नाही. विमान खरेदी व्यवहाराची माहिती दडवण्यासाठी ज्या सुरक्षा कराराचा आधारात घेतात, त्यात किंमत सांगू नये, अशी अट नाही. देशाच्या सुरक्षेसाठी वायू दलाला १२६ विमानांची आवश्यकता आहे, परंतु मोदी यांनी केवळ ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला. तो देखील दुप्पटीहून अधिक मोजून. याशिवाय तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात येणार नाही. सरकारी आणि अनुभवी कंपनीला काम देण्यात आले नाही. त्यामुळे शेकडो युवक रोजगारापासून वंचित राहिले आहेत. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती चौकशी झाला पाहिजे.

– मुकुल वासनिक,  सरचिटणीस, काँग्रेस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 3:51 am

Web Title: on the road congress against the raphael scam
Next Stories
1 लोकजागर : शिवसेनेचे स्वप्नरंजन!
2 फुलांची बाजारपेठ महागली
3 मेट्रोची ‘ट्रायल रन’ ताशी ९० किमी वेगाने
Just Now!
X