News Flash

नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट ; एकाचा मृत्यू

नितीन गडकरी यांच्या धापेवडा येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

मृत पद्माकर श्रीराव

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवडा येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे.नितीन गडकरी यांची पत्नी कांचनताई यांच्या मालकीची कांचन इंडिया ही सौंदर्य प्रसाधन कंपनी असून त्यासाठी आवश्यक उत्पादन त्यांच्या फार्महाऊस परिसरात घेतले जाते. त्या ठिकाणी हळदी उकळण्यासाठी एक बॉयलर असून त्या ठिकाणी अनेक कामगार काम करतात. मंगळवारी संध्याकाळी अचानक बॉयलरचा स्फोट झाला व त्यात एकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यावेळी कांचनताई गडकरी घटनास्थळी उपस्थित होत्या अशी माहिती आहे. यासंदर्भात कलमेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गडकरींच्या धापेवाड येथील फार्महाऊसवर स्फोट झाला असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 12:32 am

Web Title: one killed in boiler blast at nitin gadkari farmhouse
Next Stories
1 सात लाख वीजग्राहकांकडे काळ्या यादीतील कंपनीचे मीटर
2 ‘क्रेझी केसल’मध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर!
3 इंजिनिअर मित्रांचा ‘देशी बारबेक्यू’!
Just Now!
X