उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिंचखेड बिटात रविवारी सकाळी ज्या ठिकाणी नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्याचठिकाणी आज (सोमवार) एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. सलग दोन दिवसात दोन वाघांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही वाघांवर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळच्या सुमारास वन विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान वाघिणीचा मृतदेह आढळून आला. रविवारी ज्या भागात वाघाचा मृतदेह सापडला होता. त्या जागेपासून काही अंतरावरच या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. ‘टी ४’ असे मृत वाघिणीचे नाव आहे. मृत वाघाच्या बाजूला डुकराचे अवशेष सापडले. अद्याप विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.

दरम्यान, रविवारी मृतावस्थेत आढळलेला वाघ हा तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ‘जय’ या जगप्रसिद्ध वाघाचा तो बछडा होता. या परिसरात तो ‘चार्जर’ या नावाने ओळखला जात होता.