News Flash

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्य़ात गणेश मंडळांकडून वीज जोडणीला ‘खो’!

मंडळांकडून वीज कंपन्यांकडून अधिकृत तात्पुरती वीज जोडणी कायद्याने घेणे बंधनकारक आहे,

वीज दरवाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्येत घट

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘महापालिका, महावितरण, एसएनडीएल’ची बैठक घेऊन सगळ्याच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना तात्पुरती वीज जोडणी देण्याचे आदेश देत मंडळांनाही जोडणी घेण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन केले होते, परंतु त्यांच्या आवाहनाला सगळ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसत आहे. शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी कमी तात्पुरत्या वीज जोडण्या मंडळांनी घेतल्या असून १ हजार १३२ सार्वजनिक मंडळांपैकी केवळ १९८ मंडळांनीच तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे बघितले जाते. या उत्सवात नागपूर शहराच्या सगळ्याच भागात वेगवेगळ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विविध सांस्कृतिक व विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून हा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने सगळ्याच जातीधर्माचे लोक मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन एकतेचा संदेश देतात. या उपक्रमाने नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या रोज होणाऱ्या विविध कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात.

सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांकडून वीज कंपन्यांकडून अधिकृत तात्पुरती वीज जोडणी कायद्याने घेणे बंधनकारक आहे, परंतु शहरातील १ हजार १३२ पैकी केवळ १९८ मंडळांनीच या जोडण्या घेतल्या आहेत. तब्बल ९३४ सार्वजनिक मंडळांकडून अधिकृत वीज जोडणी घेण्यात आली नसल्याने ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्य़ातच या नियमाला छेद दिला गेल्याचे पुढे आले आहे. नागपूरच्या महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स या तीन विभागात एसएनडीएलकडून वीजपुरवठा केला जातो. या तीन विभागात सर्वाधिक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे अस्तित्वात आहेत. येथे गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत १८८ मंडळांकडून वीज जोडणी घेण्यात आली होती, परंतु यंदा मात्र केवळ १३० मंडळांकडूनच जोडण्या घेण्यात आली.

महावितरणच्या काँग्रेसनगर भागात गेल्यावर्षी ८० च्या जवळपास मंडळांकडून जोडणी घेण्यात आली होती, परंतु येथेही ही संख्या यंदा ७३ वर आली. ऊर्जामंत्र्यांच्या मतदारसंघ असलेल्या कामठीत केवळ २ मंडळांकडूनच तात्पुरती वीज जोडण्या घेण्यात आल्याने येथेही मंडळांकडून प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. या प्रकाराने एखाद्या गणेश उत्सव मंडळात विजेमुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जोडणी वाढवण्याकरिता प्रयत्न सुरू सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीज जोडण्या वाढवण्याकरिता ‘एसएनडीएल’कडून प्रयत्न सुरू आहेत. फ्रेंचायझीची काही पथके मंडळाकडे जाऊन त्यांना

याचे महत्त्व समजावून सांगत आहे. लवकरच त्याला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचे मत ‘एसएनडीएल’च्या जनसंपर्क विभागाकडून व्यक्त करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 5:46 am

Web Title: only 198 nagpur ganpati mandal taken temporary electricity connection
Next Stories
1 महापालिकेचे आर्थिक परावलंबत्व गडद
2 गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांचा अजूनही समावेश, दोघांना वगळले
3 आता ‘ड्रोन’लाही भ्रष्टाचाराची लागण
Just Now!
X