जिल्ह्य़ात २४ तासांत ३ मृत्यू; ३० नवीन करोनाग्रस्त

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ३ करोना  रुग्णांचा मृत्यू झाला तर केवळ ३० नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी नागपूर शहरात केवळ १ मृत्यू नोंदवण्यात आला. २४ तासांत दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर शहरातील १, ग्रामीण ०, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या दगावलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार २८८, ग्रामीण २ हजार ३०५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४१४ अशी एकूण जिल्ह्य़ात ९ हजार ७ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात १८, ग्रामीणला १०, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण केवळ ३० रुग्णांची भर पडली असून करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ३२ हजार १४४, ग्रामीण १ लाख ४२ हजार ७०५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५९४ अशी एकूण  ४ लाख ६५ हजार ६६८ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात १४३, ग्रामीणला ५० असे एकूण १९३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २५ हजार ८८६, ग्रामीण १ लाख ३९ हजार ७८२ अशी जिल्ह्य़ात ४ लाख ६५ हजार ६६८ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे.

विदर्भातील नवीन करोनाग्रस्तांची संख्या तीनशेवर

विदर्भातील एकाही जिल्ह्य़ांत २४ तासांतील रुग्णसंख्या तीन आकडय़ांवर म्हणजे शंभरावर गेली नाही. तर दिवसभरात येथे १८ रुग्णांचा मृत्यू, तर नवीन ३०८ रुग्णांची भर पडली. नागपूर शहरात २४ तासात १, ग्रामीण शून्य, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ३० नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील १६.६६ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत १ मृत्यू तर ९० नवीन रुग्ण, चंद्रपूरला ६ मृत्यू तर ३१ रुग्ण, गडचिरोलीत २ मृत्यू तर ११ रुग्ण, यवतमाळला १ मृत्यू तर १० रुग्ण, भंडाऱ्यात शून्य मृत्यू तर १६ रुग्ण, गोंदियात शून्य मृत्यू तर ३ रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर ४४ रुग्ण, अकोल्यात २ मृत्यू तर १४ रुग्ण, बुलढाण्यात २ मृत्यू तर ५५ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात शून्य मृत्यू तर ४ नवीन रुग्ण आढळले.

गृह विलगीकरणातील रुग्ण दीड हजाराहून खाली

शहरात १ हजार ५५६, ग्रामीणला २१४ असे एकूण  १ हजार ७७०  उपचाराधीन  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ३३१ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर १ हजार ४३९ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

चाचण्यांची संख्या सात हजारांवर शहरात दिवसभरात ६ हजार ६५, ग्रामीणला ८६४ अशा एकूण जिल्ह्य़ात ६ हजार ९२९  चाचण्या झाल्या. ही संख्या जिल्ह्य़ात रविवारी ९ हजार ४३ इतकी नोंदवण्यात आली होती.