20 September 2020

News Flash

करोना नियंत्रणासाठी नुसत्याच बैठका!

अनियोजनबद्ध प्रयत्नांमुळे स्थिती हाताबाहेर

अनियोजनबद्ध प्रयत्नांमुळे स्थिती हाताबाहेर;  रुग्णांना खाटा मिळेनात, मनुष्यबळाचा अभाव

नागपूर : सुरुवातीच्या काळात हातावर हात ठेवून बसलेली सरकारी यंत्रणा करोनाची साथ हाताबाहेर घेल्यावर खडबडून जागी झाली आहे. पालकमंत्र्यांसह जिल्ह्य़ातील मंत्री बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र त्यातील निर्णयांची अंमलबजावणीच होत नसल्याने त्यातून कोणातही दिलासा या साथीने त्रस्त नागरिकांना मिळत नाही, असे सध्याचे चित्र आहे.

ऑगस्टपासून नागपूर शहरात करोनाची साथ  वेगाने पसरू लागल्यावर पालकमंत्री नितीन राऊत नियमित बैठका घेत आहेत. जिल्ह्य़ातील  दुसरे मंत्री व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत करोना नियंत्रित करण्यात मोलाची भूमिका पार पाडणारे तेथील महापालिके चे आयुक्त श्री. चहल यांच्यासह इतर तज्ज्ञांना नागपुरात आणले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुंबईतून आढावा घेतला.  दुसऱ्याच दिवशी पुन्हा अनिल देशमुख आणि पालकमंत्री यांनी संयुक्तपणे आढावा बैठक घेतली. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली.

याशिवाय महापालिका आयुक्त आणि मेयो, मेडिकल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नियमित बैठका सुरूच आहेत. या बैठकांमध्ये  सरकारी आणि खासगी रुग्णालयातील खाटांचे वाटप, सरकारी आणि महापालिके च्या रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा, रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, खाटांच्या उपलब्धतेसाठी इलेट्रम्ॉनिक डॅशबोर्ड, रुग्णांच्या मदतीसाठी हेल्पलाईन आदींबाबत चर्चा होते. मात्र बैठकीतील निर्णयावर अंमलबजावणी होताना दिसत नाही. आतापर्यंत महापालिके ने फक्त डॅशबोर्ड तयार के ला, रुग्णवाहिके ची संख्या ६५ पर्यंत वाढली. मात्र डॅशबोर्डवरील माहिती अपुरी आहे आणि रुग्णांना अजूनही बेड मिळत नाही. रुग्णवाहिकांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. चहल समितीने अत्यवस्थ रुग्णांसाठी वेगळा वार्ड, सरकारी व खासगी रुग्णालयात खाटांची संख्या वाढवणे आदी सूचना के ल्या होत्या. यापैकी काहीच झाले नाही. फक्त चाचण्यांची संख्या वाढवली, पण सकारात्मक रुग्णांवर उपचारासाठी सुविधा दिल्या नाही आणि विशेष म्हणजे, याबाबत कोणी बोलत नाहीत. महापालिके ने घाईघाईत रुग्णवाहिकांची संख्या वाढवली. पण त्या रुग्णांना उपलब्ध होतात का?  तसेच डॅशबोर्डवरील माहिती अचूक आहे का, रुग्णांना खाटा मिळत आहे का, हेल्पलाईन्सचे क्रमांक  लागतात का? यावर देखरेख करणारी कोणतीही यंत्रणा महापालिके कडे नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे.

यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क  साधला असता बैठकीतील सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवस्था सुरळीत होईल. सरकारच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना के ल्या जात आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगितले.

मनुष्यबळाबाबत निर्णय नाही

महापालिके चे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिके च्या पाच रुग्णालयांना कोविड रुग्णालयात रूपांतर के ल्यावर त्यांना वाढीव मनुष्यबळाची गरज भासली. त्यापूर्वी मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्यावर हा प्रश्न निर्माण झाला  होता. जुलै महिन्यापासून वाढीव मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची मागणी होत आहे. प्रत्येक बैठकीत याबाबत चर्चा होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. त्यांच्याही पुढे हे गाऱ्हाणे मांडण्यात आले होते. पालकमंत्री, गृहमंत्र्यांच्या प्रत्येक बैठकीत याबाबत चर्चा होते. मात्र अद्यापही मनुष्यबळाचा प्रश्न सुटला नाही. रविवारी झालेल्या बैठकीत पुन्हा यावर चर्चा झाली. युद्धपातळीवर यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 1:29 am

Web Title: only meeting by minister for corona control zws 70
Next Stories
1 Coronavirus : दिवसभरात केवळ ४,६३३ नमुन्यांची चाचणी
2 काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत
3 विद्यापीठांच्या परीक्षा रद्द व्हाव्या यावर आजही ठाम!
Just Now!
X