News Flash

नवी मुंबईतील मेट्रोचे संचालन महामेट्रोकडे

महामेट्रोकडे असलेल्या मेट्रो प्रकल्पापैकी नागपुरात दोन मार्गिकांवर मेट्रो सुरू झाली आहे.

नागपूर : नागपूर, पुणे या दोन महानगरानंतर आता नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांतर्गत गाडी संचालनाचे काम महामेट्रोकडे सोपवण्यात आले आहे.

नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची उभारणी सिटी अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (सिडको) केली असून गाडी चालवण्याची जबाबदारी पुढील १० वर्षांकरिता महामेट्रोकडे सोपवली आहे. सध्या तेथे एका मार्गिकेचे काम सुरू आहे. ते पूर्ण करण्याचे कंत्राट महा मेट्रोला मिळाले आहे. यापूर्वी अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात यासंदर्भात करार होणार असल्याचे, महामेट्रोकडून सांगण्यात आले. महामेट्रोकडे असलेल्या मेट्रो प्रकल्पापैकी नागपुरात दोन मार्गिकांवर मेट्रो सुरू झाली आहे.उर्वरित दोन मार्गिकेचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या खेरीज पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. महामेट्रोने आराखडा तयार केलेल्या नाशिक मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या शिवाय महामेट्रोने ठाणे आणि तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:01 am

Web Title: operation of navi mumbai metro to mahametro cidco akp 94
Next Stories
1 डेंग्यूची दांडगाई!
2 रुग्णाच्या घराजवळील ५०० घरांचे सर्वेक्षण 
3 निवडणुकीवर डोळा ठेवून नगरसेवक ‘कामाला’ लागले! 
Just Now!
X