वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालातील वास्तव

नागपूर : राज्यभरात करोनाच्या ३१ ऑक्टोबपर्यंत आढळलेल्या एकूण १६ लाख ७५ हजार ३३७ बाधितांमध्ये दहा वर्षांखालील केवळ ३.६१ टक्के मुलांचाच समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

अहवालानुसार राज्यात ३१ ऑक्टोबपर्यंत एकूण १६ लाख ७५ हजार ३३७ करोनाबाधितांची नोंद झाली. एकूण बाधितात केवळ ६० हजार ५५५ (३.६१ टक्के) दहा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. ११ ते २० वयोगटातील १ लाख १३ हजार ९३२ (६.८० टक्के) मुलांना करोनाचे संक्रमण झाले. २१ ते ३० वयोगटात २ लाख ८१ हजार ८७५ (१६.८२ टक्के), ३१ ते ४० वयोगटात ३ लाख ५५ हजार ५९० (२१.२२ टक्के), ४१ ते ५० वयोगटात २ लाख ९९ हजार ६२४ (१७.८८ टक्के), ५१ ते ६० वयोगटात २ लाख ६८ हजार ३१३ (१६.०२ टक्के), ६१ ते ७० वयोगटात १ लाख ८१ हजार ५७० (१०.८४ टक्के), ७१ ते ८० वयोगटात ८६ हजार ३९६ (५.१६ टक्के), ८१ ते ९० वर्षे वयोगटात २४ हजार ३५७ (१.४५ टक्के), ९१ ते १०० वयोगटात ३ हजार ११५ (०.१९ टक्के), १०१ ते ११० वर्षे वयोगटात १० रुग्णांनाच करोनाची बाधा झाली. तर यशस्वी उपचारामुळे एकूण रुग्णांतील १५ लाख १० हजार ३५३ व्यक्ती करोनामुक्त झाले. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९०.१५ टक्के आहे. तर सध्या राज्यात १ लाख २३ हजार ५८५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात आजपर्यंत करोनाने ४३ हजार ९११ मृत्यू झाले आहेत.