• पोलीस आयुक्तांकडे वृद्ध महिलेची तक्रार, एसआयटीकडून तपास सुरू
  • ८ एकरचे विक्रीपत्र करून ९ एकरवर बांधकाम

सिद्धेश्वर सभागृहाचे मालक आणि शिवशक्ती गृहनिर्माण सोसायटीचे संस्थापक सुधाकर झाडे यांनी एका महिलेशी ८ एकर जमिनीच्या विक्रीचा करार करून तिची ९ एकर जमीन लाटली आणि बांधकाम सुरू केले. झाडे यांनी जवळपास १० कोटी रुपये किंमत असलेला मौजा सोनेगाव हद्दीतील १ एकर भूखंड हडपून फसवणूक केल्याची तक्रार एका वृद्ध महिलेने पोलीस आयुक्तांकडे केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्यात येत आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
What is the total wealth of NCP candidate Amar Kale
“असावे घरकुल ठिकठिकाणी”, अमर काळे यांच्या संपत्तीचे विवरण असे…
Who is Landmark Group CEO Renuka Jagtiani
एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

मौजा सोनेगाव येथे शेत क्रमांक ११ व १२/४ येथे दिगंबरराव पेशने यांच्या मालकीची ८.९६ एकर शेती होती. त्यापैकी ०.९६ एकर जमीन ही कमाल जमीन धारण (यूएलसी) कायद्यांतर्गत सरकारने आपल्या ताब्यात घेतली होती. त्यापैकी ८ एकर शेत ९ लाख २० हजार रुपयांत १९८८ मध्ये सुधाकर झाडे व त्यांच्या शिवशक्ती गृहनिर्माण सोसायटीला विकले. त्यासाठी झाडे यांनी ४-४ एकर जमिनीच्या खरेदीचे दोन विक्रीपत्र केले. सरकारने ताब्यात घेतलेली जमीन आपल्याकडेच ठेवली. मात्र, कालांतराने सरकारने यूएलसी अंतर्गत घेतलेल्या जमिनीचा कोणताही वापर न करता ती मूळ शेतमालकाला परत केली.

याची माहिती पेशने कुटुंबीयांना उशिरा मिळाली. मात्र, त्यापूर्वीच झाडे यांनी उर्वरित ०.९६ एकर शेतीचे बनावट दस्तावेज तयार केले आणि ती जमीन बळकावली. एक दिवस पेशने यांचे वारसदार शेखर पेशने यांनी यूएलसी कायद्यांतर्गत सरकारने घेतलेली जमीन परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राज्य सरकारने त्यांना कागदोपत्री जमीन परत केली, परंतु ते जमिनीवर गेले असता त्या ठिकाणी शिवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेचेच बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यांनी माहितीच्या अधिकारात महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासकडून माहिती मागितली. त्यावेळी झाडे यांनी बनावट दस्तावेज तयार करून त्यांची ०.९६ एकर जमीन हडपल्याचे समोर आले.

त्यानंतर त्यांनी दिगंबरराव पेशने यांची पत्नी बेबीताई दिगंबरराव पेशने यांच्यावतीने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु पोलीस तक्रारदारावरच दबाव टाकून झाडे यांच्याशी तडजोड करण्यास सांगू लागले. शेवटी बेबीताई पेशने यांनी २४ मे २०१७ ला पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी प्रकरण एसआयटीकडे पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत. लवकरच प्रकरण तडीस जाण्याची शक्यता आहे.

कागदावर ९ एकर, प्रत्यक्षात ७.५ एकरच

सातबारा आणि खसऱ्यावर ही जमीन ८.९६ एकर दाखवत आहे. मात्र, जमिनीच्या मोजणीत ती ७.३० एकरच भरते. त्यामुळे पेशने यांच्याशी ८ एकर जागेच्या विक्रीचा व्यवहार झाला होता, परंतु आम्हाला केवळ ७.५ एकरच जमीन मिळाली. आपण कुणाचीही फसवणूक केली नाही.

सुधाकर झाडे